मुंबई - Shah Rukh Khan health updateशाहरुख खान मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झालेला प्लेऑफ सामना पाहण्यासाठी मैदानावर हजर होता. यावेळी तब्येतीचा त्रास सुरू झाल्यामुळे त्याला तातडीनं केडी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. उष्णतेच्या लाटेमुळे त्याला डीहायड्रेशनचा त्रास झाला. त्याला रुग्णालयात दाखल केल्याच्या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं. आता त्याची मॅनेजर पूजा ददलानी हिनं शाहरुख खानच्या हेल्थ अपडेट दिले आहेत.
मॅनेजरनं दिली शाहरुख खानची हेल्थ अपडेट
21 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्याच्यावेळी पूजा दादलानी शाहरुख खानबरोबरच नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे हजर होती. आज 23 मे रोजी शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानी हिनं तिच्या एक्स या सोशल मीडिया हँडलवर शाहरुखच्या तब्येतीचे हेल्थ अपडेट दिले आहे. याबरोबरच तिनं शाहरुख खानच्या चाहत्यांचे त्याच्याबद्दल काळजी केल्याबद्दल आभार मानले आहेत. पूजाने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'श्रीयुत शाहरुख खान यांच्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे त्यांच्याबद्दल काळजी केल्याबद्दल आभार. आता त्यांची प्रकृती ठीक आहे आणि ते बरे होत आहेत.