महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आयफा अवॉर्ड 2024 साठी शाहरुख खान अबु धाबीत दाखल, 'द किंग'च्या डॅशिंग लूकवर फॅन्स फिदा - SRK arrives in Abu Dhabi for IIFA - SRK ARRIVES IN ABU DHABI FOR IIFA

IIFA Awards 2024 : आयफा अवॉर्ड्स 2024 चा उत्सवी सोहळा 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान अबु धाबीत होत आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीला समर्पित कार्यक्रमानं सोहळ्याची दिमाखात सुरुवात होईल. यासाठी यजमान शाहरुख खानचं आगमन झालं असून त्याच्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

Shah Rukh Khan
शाहरुख खान (Shah Rukh Khan( Image source: Instagram/ @iifa))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 4:31 PM IST

अबू धाबी - ( यूएई ) - आयफा अवॉर्ड्स 2024 चा आयोजक असलेला बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान नव्या सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे. या मेगा इव्हेन्टसाठी तो अबु धाबीत दाखल होताच त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. आयफाच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने शाहरुखचे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंच्या मालिकेत तो नेहमीप्रमाणे त्याच्या शोभून दिसणाऱ्या कॅज्युअल पोशाखात डॅशिंग दिसत होता.

शाहरुख खान (Shah Rukh Khan( Image source: Instagram/ @iifa))

"द किंगचं आगमन झालंय. तो अतिशय डॅशिंग दिसत असून बादशाहचं ग्रँड आगमन होत असताना आम्ही शांत राहू शकत नाही...उत्सुकता वाढीस लागली असताना सर्वांच्या नजरा द शाहरुख खानवर खिळल्या आहेत", असं त्याच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय.

शाहरुख खान (Shah Rukh Khan( Image source: Instagram/ @iifa))

गुरुवारी पहाटे, शाहरुख आयफा अवॉर्ड्स २०२४ च्या सोहळ्यात हजर राहण्यासाठी अबुधाबीला निघाला असताना मुंबई विमानतळावर उत्साही चाहत्यांच्या गर्दीनं त्याला घेरलं होतं. त्याचे अंगरक्षक आणि व्यवस्थापक पूजा ददलानी यांच्यासह विमानतळावर आलेल्या शाहरुखला पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांच्या गराड्यातून तो अलगद विमानतळामध्ये प्रवेश करताना दिसला. काळ्या रंगाचा हुडी, सनग्लासेस आणि टोपी घातलेल्या, शाहरुख खानने विमानतळावरील चाहत्यांच्या गोंधळातही शांतपणे आपल्या स्टाईलनं उपस्थितांची मनं जिंकली.

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्काराचा यंदाचा सोहळा 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान अरब शहरात होणार आहे. तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या दक्षिणेकडील फिल्म इंडस्ट्रीला समर्पित कार्यक्रमानं या तीन दिवसाच्या सोहळ्याला सुरुवात होईल. या कार्यक्रमात मेगास्टार चिरंजीवी यांचा गौरव करण्यात येणार आहे.

दुसऱ्या दिवशी, शाहरुख खान, विकी कौशल आणि करण जोहर सारखे स्टार्स आयफा अवॉर्ड्सच्या झगमगत्या रात्री त्यांच्या होस्टिंग स्टंटसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मंचावर येतील आणि प्रेक्षकांचं धमाल मनोरंजन करतील.

अलीकडेच, शाहरुख खान आणि करण जोहर, मुंबईत आयफा प्री इव्हेंटमध्ये एकत्र दिसले होते. यावेळी दोघांनी त्यांचे मजेदार बाँड प्रदर्शित केले होते. तेव्हा शाहरुखने करणला अधिक चॅट शो होस्ट करण्यासाठी आणि चित्रपटांवरील कमी लक्ष केंद्रित केल्याबद्दल छेडले असता दोघांमध्ये भरपूर शाब्दिक कोट्या झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी शाहरुखने शेअर केले होते की करणने त्याला सांगितलंय की तो रिहर्सलसाठी उपलब्ध राहणार नाही आणि तो शो होस्ट करण्यात चांगला तरबेज असल्याने तो झूमवर प्रॅक्टीस करण्याची योजना आखत आहे.

विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशी रेखा दीर्घकाळानंतर आयफाच्या मंचावर परतताना दिसणार आहे. शाहिद कपूर, क्रिती सेनॉन, अनन्या पांडे, जान्हवी कपूर आणि विकी हे देखील त्यांच्या परफॉर्मन्सने गाला नाईटमध्ये आकर्षण वाढवणार आहेत. आयफा 2024 चा समारोप 29 सप्टेंबर रोजी केवळ-आमंत्रण असलेल्या IIFA रॉक्ससह होईल. यामध्ये हनी सिंग, शिल्पा राव आणि शंकर-एहसान-लॉय सारखे कलाकार प्रेक्षकांसाठी लाईव्ह परफॉर्म करतील.

हेही वाचा-

  1. आयफा 2024साठी ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्याबरोबर अबू धाबीला पोहचली, व्हिडिओ व्हायरल - aaradhya BACHCHAN
  2. रेखा आयफा 2024 मध्ये 22 मिनिटे परफॉर्म करणार , अबू धाबीत पोहोचल्यानंतर शेअर केले फोटो - Rekha arrived Abu Dhabi
  3. आईफा नामांकनावर रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'सह 'या' स्टारचे वर्चस्व, येथे पहा संपूर्ण यादी - iifa awards 2024

ABOUT THE AUTHOR

...view details