महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'सरफरोश'ला 25 वर्षे पूर्ण, आमिर खाननं स्क्रिनिंगदरम्यान 'सरफरोश 2'ची केली घोषणा - aamir khan - AAMIR KHAN

Aamir Khan: आमिर खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'सरफरोश'ला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या विशेष प्रसंगी स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. यादरम्यान आमिरनं 'सरफरोश 2'बद्दलचं वक्तव्य केलं.

Aamir Khan
आमिर खान ((Aamir Khan- Instagram))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 11:53 AM IST

मुंबई Aamir Khan : अभिनेता आमिर खान नुकताच त्याच्या 'सरफरोश' चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये दिसला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 25 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्तानं चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं. हा चित्रपट 30 एप्रिल 1999 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन जॉन मॅथ्यू माथन यांनी केलं. त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. आमिर खान स्टारर सरफरोश' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाची कहाणी अनेकांना आवडली. 'सरफरोश'च्या स्क्रिनिंगदरम्यान पुन्हा एकदा 'सरफरोश 2'ची चर्चा सुरू झाली आहे.

'सरफरोश 2'बद्दल केलं आमिर खाननं विधान : या कार्यक्रमादरम्यान आमिरनं 'सरफरोश 2' संदर्भात आपलं मत व्यक्त करत म्हटलं "सरफरोश 2' बनवायला पाहिजे आणि मलाही तेच वाटत आहे. आम्ही योग्य कहाणीच्या शोधात आहोत. जर सर्व काही ठीक झालं, तर जॉन तुम्हाला यासाठी पुन्हा तयार राहावं लागेल." आता आमिरच्या या विधानानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना 'सरफरोश 2'मध्ये एसीपी अजय सिंह पाहायला मिळेल. 'सरफरोश' चित्रपटात आमिर खान व्यतिरिक्त सोनाली बेंद्रे ही मुख्य भूमिकेत दिसली होती, तर नसीरुद्दीन शाहनं या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकरली. या चित्रपटामधील गाणी देखील प्रचंड हिट झाली.

'सरफरोश 2'बद्दल : 'सरफरोश' चित्रपटाचे दिग्दर्शक जॉन मॅथ्यू यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत की, 'सरफरोश'चा दुसरा भाग बनवण्याची त्यांची इच्छा आहे. मी चित्रपटसृष्टीत परतण्यास खूप उत्सुक आहे. आता सध्या चांगल्या कहाणीच्या शोधात आहे." दरम्यान 'सरफरोश'च्या स्क्रिनिंगला आमिर खान, सोनाली बेंद्रे, नसीरुद्दीन शाह, जॉन मॅथ्यू, गोविंद नामदेव, ललित पंडित, मुकेश ऋषी, अखिलेंद्र मिश्रा, राजेश जोशी, मकरंद देशपांडे, मनोज जोशी, उपासना सिंग, स्मिता जयकर आणि आकाश खुराणा यांनी हजेरी लावली होती. आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच 'सितारे जमीन पर' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो सनी देओलबरोबर 'लाहोर 1947' या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. राजकुमार राव अभिनीत 'श्रीकांत' केली पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई - rajkummar rao
  2. साई पल्लवी ते सामंथापर्यंत 'या' प्रतिभावान अभिनेत्री बॉलिवूड आणि ओटीटी पदार्पणासाठी सज्ज - South Divas in Bollywood
  3. स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित ‘फुलवंती’मधून प्राजक्ता माळीचं चित्रपट निर्मितीत पदार्पण - Prajakta Mali

ABOUT THE AUTHOR

...view details