मुंबई- Salman Khan Eid : अभिनेता आणि निर्माता सोहेल खान यानं जवळच्या मित्रांसाठी आणि कुटुंबीयांसाठी ईद निमित्तानं पार्टीच आयोजन केलं होतं. या सेलेब्रिशनसाठी हजर राहिलेल्या स्टार कलाकारांमध्ये 'अॅनिमल' स्टार बॉबी देओल, रणबीर कपूर, आलिया भट्टसह त्याचे भाऊ सलमान आणि अरबाज खान यांच्यासह अनेकजण सामील झाले होते. यावेळी सलमान खानचा रुबाब पाहण्यासारखा होता.
ईदच्या निमित्तानं सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटाची घोषणा करण्यात आल्याचं आपण वाचलं असेल. सलमान स्वतः सोशल मीडियावरुन ही घोषणा करताना यंदाच्या ईदला 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'मैदान' हे चित्रपट पाहण्याचे आवाहन केलं होतं. पुढच्या वर्षीचा ईदला 'सिकंदर' भेटणार असल्याचं सांगत त्यानं सर्वांना शुभच्छा दिल्या होत्या. हा चित्रपट साऊथचा यशस्वी दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास बनवत आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 'दबंग' सुपरस्टार सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये खास भेटीसाठी गेले होते. सलमानच्या जवळच्या व्यक्तीनं त्याच्या घरातील रणबीर आणि आलियाबरोबर त्याचे फोटो शेअर केले आहेत. या व्हायरल फोटोमध्ये आलिया पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल सूटमध्ये दिसत आहे. तर रणबीर ब्लू डेनिम जॅकेट, स्काय ब्लू टी-शर्ट आणि मॅचिंग जीन्समध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये दोघेही त्यांच्या एका चाहत्यासोबत कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहेत.