मुंबई - Salman Khan and Rajinikanth :चित्रपटसृष्टीतून एक मोठी स्फोटक बातमी समोर येत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत हे पहिल्यांदाच घडणार आहे. साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली करणार आहे. शाहरुख खानच्या 'जवान'चं दिग्दर्शन ॲटलीनं केलं होत, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती. मिळालेल्या माहितीनुसार ॲटलीच्या या चित्रपटात मास ॲक्शन असणार आहे. ॲटली सुरुवातीला हा चित्रपट साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनबरोबर बनवणार होता, मात्र फीच्या वादामुळे ॲटलीचा हा चित्रपट सलमान खानला मिळाला.
रजनीकांत आणि सलमान खान दिसणार एकत्र :अल्लू अर्जुननं हा चित्रपट सोडल्यानंतर सलमान खानचं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं होतं. अलीकडेच अशी बातमी आली होती की ॲटलीच्या मास ॲक्शन चित्रपटात रणवीर सिंग सलमान खानबरोबर ॲक्शन करताना दिसणार आहे. मात्र या चित्रपटात सलमान खानबरोबर रजनीकांत असणार आहे. ॲटलीच्या या चित्रपटात सलमान खान आणि रजनीकांत मास ॲक्शन करणार आहेत. आता या बातमीला निर्मात्यांनी दुजोरा दिलेला नाही. सलमान खान आणि रजनीकांत एका चित्रपटात एकत्र आले तर ते भारतीय चित्रपट उद्योगातील आतापर्यंतचे सर्वात मोठे सहकार्य असेल.