महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला धोनीसह 'या' दिग्गज खेळाडूंची हजेरी, वाचा कोण कोण उपस्थित - Anant and Radhika Pre wedding

Anant and Radhika Pre wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या गुजरात येथील जामनगर येथे होत असलेल्या प्री-वेडिंग कार्यक्रमामध्ये भारतीय क्रिकेटमधील अनेक मोठ्या व्यक्ती पोहोचल्या आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भारताव्यतिरिक्त इतर देशांचे क्रिकेटपटूही सहभागी होणार आहेत.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला सितारे
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला सितारे

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 6:42 PM IST

नवी दिल्लीAnant and Radhika Pre wedding : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगला हजेरी लावण्यासाठी क्रिकेट जगतातील मोठमोठे सितारे गुजरातच्या जामनगरला पोहोचत आहेत. या प्री-वेडिंगसाठी पोहोचलेल्या क्रिकेटपटूंमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स संघातील अनेक क्रिकेटपटूही पोहोचले आहेत. मुंबई इंडियन्स ही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची टीम आहे. यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याही या कार्यक्रमाला पोहोचला.

सचिन तेंडुलकरही जामनगरला पोहोचला : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगला उपस्थित राहण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पत्नी साक्षीसोबत पोहोचला आहे. तसंच, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि टीमचा माजी क्रिकेटर कृणाल पांड्याही पोहोचला आहे. या कार्यक्रमासाठी पांड्या बंधू एकत्र आले आहेत. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचला आहे. सचिन तेंडुलकरही जामनगरला पोहोचला आहे. हे सर्व क्रिकेटपटू आपल्या कुटुंबासह या सोहळ्याला पोहचले आहेत. आयपीएलच्या पहिल्या सत्रात सचिन मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होता.

क्रिकेटपटूंशिवाय अनेक उद्योगपती उपस्थित : नुकताच बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून मुक्त झालेला मुंबई इंडियन्सचा खेळाडू इशान किशनही येथे पोहोचला आहे. ईशान व्यतिरिक्त वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर देवेन ब्राव्हो देखील अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगला हजर राहण्यासाठी पोहोचला आहे. या कार्यक्रमात सूर्यकुमार यादवही पत्नीसोबत पोहोचला आहे. या कार्यक्रमात झहीर खानही पोहोचला आहे. भारताची बॅडमिंटन स्टार सायनाही तिथे पोहोचली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग फंक्शन 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान चालणार आहे. या कार्यक्रमात क्रिकेटपटूंशिवाय अनेक उद्योगपती आणि बॉलीवूड स्टार्सही दिसणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details