हैदराबाद Rakul Preet Brother Arrested : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा भाऊ अमन प्रीत सिंगवर ड्रग्ज प्रकरणात कारवाई करण्यात आलीय. सायबराबाद आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी अमन प्रीत सिंग याला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलं. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्युरो (TGANB) आणि सायबराबादच्या नरसिंगी पोलिसांनी संयुक्त छापेमारीनंतर अटक केलेल्या पाच जणांमध्ये अमन प्रीत सिंगचा समावेश आहे.
हैदराबाद पोलीस करणार तपास :तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्युरोच्या (TGANB) अधिकाऱ्यांनी त्यांच्या ताब्यातून 35 लाख रुपये किमतीचे 199 ग्रॅम कोकेन, दोन पासपोर्ट, दोन चारचाकी वाहनं, 10 मोबाईल फोन आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त केलं. अमन प्रीत सिंगसह पोलिसांनी चार नायजेरियन नागरिकांनाही ताब्यात घेतलंय. रकुल प्रीत सिंगनं अद्याप तिच्या भावाच्या अटकेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमन प्रीत सिंगला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हैदराबाद पोलीस या प्रकरणाचा तपास करणार आहेत.
ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश : तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्युरोनं एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. यामध्ये एका महिलेच्या नेतृत्वाखालील टोळीनं सहा महिन्यांच्या कालावधीत 2.6 किलो कोकेन विक्री आणि सेवनासाठी हैदराबादला आणले होते. यानंतर, वरिष्ठ आयपीएस अधिकारी संदीप संदिल्या आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली नार्कोटिक्स ब्युरोनं हैदराबादमधील 30 लोकांची माहिती काढली. हे लोक ड्रग्ज खरेदी करणार आहे. या 30 जणांची नावं सायबराबाद आयुक्तालयाकडं सोपवण्यात आली असून यामध्ये अमन प्रीत सिंगच्या नावाचाही समावेश आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देत एका अधिकाऱ्यांनं सांगितलं की, तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्युरो आणि नरसिंगी पोलिसांनी जनब फोर्ट व्ह्यू अपार्टमेंट, विशाल नगर, हैदरशाकोट येथील फ्लॅट क्रमांक 202 येथे कारवाई केली. दोन परदेशी नागरिकांसह पाच जणांना ताब्यत घेतलं. अजीज नोहीम अदेशोला (वय 29, लागोस, नायजेरिया), अल्लम सत्य वेंकट गौथम (वय 31, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश), सनाबोइना वरुण कुमार (वय 42, अमलापुरम, आंध्र प्रदेश) आणि मोहम्मद महबूब शरीफ (वय 36, रा. रंगारेड्डी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.
हेही वाचा -
- रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाला एका महिना पूर्ण; शेअर केला व्हिडिओ - Rakul and Jackky
- रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांनी गुवाहाटीमधील कामाख्या देवी मंदिरात कुटुंबासह घेतलं दर्शन
- नवविवाहित जोडपे रकुल आणि जॅकीनं 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील 'मस्त मलंग झूम' गाण्यावर केला भन्नाट डान्स