मुंबई - Rakt Bramhand:चित्रपट निर्माते राज आणि डीके यांनी 'रक्त ब्रम्हांड - द ब्लडी किंगडम' नावाचा आणखी एक नेटफ्लिक्स प्रोजेक्ट सुरू केला आहे. याची घोषणा नेटफ्लिक्स इंडियानं आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर केली आहे. वेब सीरीजमधील कलाकारांची लवकरच घोषणा केली जाणार असल्याचं समजत आहे, मात्र 'रक्त ब्रम्हांड - द ब्लडी किंगडम'मध्ये अली फजल आणि सामंथा रुथ प्रभू दिसू शकतात. याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ओटीटी नेटफ्लिक्सनं एका मनोरंजक पोस्टरसह याची घोषणा करून आता सिनेप्रेमींना एक सप्राईज दिलंय. 'रक्त ब्रम्हांड - द ब्लडी किंगडम'चं दिग्दर्शन 'तुंबाड' फेम राही अनिल बर्वे करणार आहे.
राज आणि डीके आणि नेटफ्लिक्स इंडियानं 'रक्त ब्रम्हांड - द ब्लडी किंगडम'ची केली घोषणा, पोस्टर व्हायरल - RAKT BHRAMHAND - RAKT BHRAMHAND
Rakt Bhramhand: 'गन्स एन रोजेज'नंतर, चित्रपट निर्माता जोडी राज आणि डीके आता 'रक्त ब्रम्हांड - द ब्लडी किंगडम' या वेब सीरीजसह आणखी एका धमाका करण्यासाठी सज्ज आहेत. आता या सीरीजमधील स्टारकास्ट लवकरच जाहीर होणार आहे.
Published : Jul 27, 2024, 3:21 PM IST
'रक्त ब्रम्हांड - द ब्लडी किंगडम'चं पोस्टर :राज आणि डीकेच्या नवीन नेटफ्लिक्स वेब सीरीजच्या घोषणा पोस्टरवर एक मुकुट असल्याचं दिसत आहे. यामध्ये मुकुटाच्या प्रत्येक कोपऱ्यातून रक्त टपकत आहे. राजकुमार राव, दुल्कर सलमान आणि आदर्श गौरव स्टारर 'गन्स एन रोजेज'नंतर नेटफ्लिक्सबरोबर राज आणि डीकेचं दुसरे एकत्रित प्रोजेक्ट आहे. 'रक्त ब्रम्हांड - द ब्लडी किंगडम'चं पहिलं पोस्टर शेअर करताना नेटफ्लिक्सच्या इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिलं, "आम्हाला मोठी बातमी मिळाली आहे, जी तुमचे रक्त खवळवेल! आमची पहिली ॲक्शन-फँटसी वेब सीरीज जाहीर करताना आम्ही खूप उत्सुक आहोत."
कलाकारांची कास्टिंग लवकरच होणार :ही वेब सीरीज रोमांचित करणारी असणार आहे. एका काल्पनिक राज्याच्या भोवती या सीरीजची कहाणी असणार आहे, ज्यामध्ये ॲक्शन आणि सुंदर दृश्ये असेल. या वेब सीरीजच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. नेटफ्लिक्स बरोबरच्या त्यांच्या सहकार्याबद्दल बोलताना, राज आणि डीके यांनी म्हटलं, "आमच्यासाठी हे काहीतरी नवीन आहे, जे हे आणखी रोमांचक बनवेल. आमचे ध्येय एक काल्पनिक जग तयार करणे आहे. आम्हाला आमच्या बालपणात ऐकलेल्या कहाणीची आठवण ही सीरीज करून देईल. नेटफ्लिक्सबरोबर काम करणं खूप चांगलं आहे आणि आम्ही 'रक्त ब्रम्हांड - द ब्लडी किंगडम'साठी खूप उत्सुक आहोत." यानंतर राज आणि डीके यांच्या 'सिटाडेल'ची हिंदी आवृत्ती रिलीज होणार आहे. यामध्ये वरुण धवन आणि सामंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरीज प्राइम व्हिडिओवर प्रसारित केली जाणार आहे.