मुंबई - R Madhavan's New Poster from 'Shaitaan :अभिनेता अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका स्टारर 'शैतान' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट काळ्या जादूवर आधारित आहे. दरम्यान 'शैतान' चित्रपटामधील आर. माधवनचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यापूर्वी निर्मात्यांनी अजय देवगण आणि ज्योतिका यांचं पोस्टर रिलीज केलं होतं. आता आर. माधवनचं रिलीज झालेलं पोस्टर हे खूप थरारक आहे. या पोस्टरमध्ये त्याचे डोळे हे निळे आणि चेहऱ्यावर एक शैतानी हास्य दिसत आहे. त्याचा लूक पाहिल्यानंतर अनेकजण या रिलीज झालेल्या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
'शैतान' चित्रपटामधील पोस्टर रिलीज : मंगळवारी आर. माधवननं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'शैतान' या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले. यावर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'मी शैतान आहे. 'शैतान' चित्रपट 8 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल.'' 'शैतान'मध्ये माधवननं खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलंय. 'शैतान' चित्रपटाचा टीझर 25 जानेवारी 2024 रोजी रिलीज झाला होता. टीझरमध्ये आर. माधवन भीतीबद्दल सांगताना दिसला होता. दरम्यान या चित्रपटातून ज्योतिकानं पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.