महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रानं दाखवली कुशीतील मालतीबरोबरची सुंदर झलक - प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रानं मुलगी मालती मेरीबरोबर सकाळची प्रसन्न झलक शेअर केलीय. छोटी मालती तिच्या कडेवर बसल्याची दिसतेय. मायलेकींचा हा सुंदर फोटो चाहत्यांना आवडल्याचं दिसतंय.

Priyanka Chopra's Morning Picture
प्रियांका चोप्रा मुलगी मालती मेरीसोबत

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 12:08 PM IST

Updated : Feb 7, 2024, 12:17 PM IST

मुंबई : प्रियांका चोप्रा तिच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांना नियमित देऊन त्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी नेहमी सज्ज असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या ग्लेबल स्टारनं अलीकडंच तिच्या सकाळची एक झलक शेअर केली. फोटोत 'ग्लोबल आयकॉन' तिची मुलगी मालती मेरीसह दिसत आहे.

'देसी गर्ल' अशी ओळख असलेली प्रियांका आपल्या मुलीला कडंवर घेऊन सकाळचा आनंद घेताना दिसतेय. तिनं ऑनलाइन पोस्ट केलेल्या फोटोमध्ये, प्रियांकानं जांभळ्या फुलांनी मॅचिंग असणारा पांढरा पायजमा सेट घातला होता. तिच्यासोबत तिची लहान मुलगी मालती होती, जी तिच्या हिरव्या स्वेटशर्टमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. चिमुकली मालती तिच्या आईच्या कुशीत, उबदार, तपकिरी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेली दिसली.

तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करताना, प्रियांकानं फोटोसह सकाळचे सुंदर वर्णन केलंय. त्यापूर्वी तिनं मॅगीच्या वाटीचा फोटोही टाकला होता. दुसऱ्या एका इन्स्टा स्टोरीमध्ये तिनं पती निक जोनास श्रेया घोषालचं गाणं ऐकत ड्रायव्हिंग करतानाचा फोटोही शेअर केला होता.

हॉलिवूडमध्ये बिझी असलेली प्रियांका अभिनेत्री आणि उद्योजक असूनही तिच्या दिवसाबद्दल आणि करिअरबद्दल वारंवार तपशील शेअर करत असते. ती नेहमीच तिचा नवरा, अमेरिकन गायक निक जोनास आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससाठी वेळ काढते. त्यांच्याबद्दल ती ऑनलाइन पोस्ट करत असते. सार्वजनिक कार्यक्रमात असो किंवा सोशल मीडियावर प्रियांका आणि निक जोनास वारंवार एकत्र छोट्या छोट्या गोष्टी करून त्यांचं महत्व सिद्ध करताना दिसतात. या जोडप्यानं लाँग ड्राईव्हच्या फोटोसह एका उदास दिवसात रोमान्स कसा जिवंत ठेवायचा हे दाखवून दिलं आहे.

कामाच्या आघाडीवर, प्रियांका चोप्रा आगामी चित्रपट हेड्स ऑफ स्टेटमध्ये जॉन सीना आणि इद्रिस एल्बा सोबत दिसणार आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित आगामी 'जी ले'मध्ये ती आलिया भट्ट आणि कतरिना कैफसह दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. संभाजी महाराजांच्या अजेय पराक्रमाची गाथा 'शिवरायांचा छावा'चा ट्रेलर रिलीज
  2. ईशा देओल आणि भरत तख्तानी लग्नाच्या १२ वर्षांनंतर झाले वेगळे
  3. 'स्वर माऊली' लता मंगेशकरांनी अमर केले संतांचे अभंग
Last Updated : Feb 7, 2024, 12:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details