मुंबई - Priyanka Chopra :अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर एक प्रेमळ आई देखील आहे. ती सध्या ऑस्ट्रेलियात तिच्या आगामी 'द ब्लफ' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. प्रियांका एकटीच ऑस्ट्रेलियाला गेली नाही, तर ती मुलगी मालतीलाही घेऊन गेली आहे. तिच्या व्यग्र वेळापत्रकातून तिनं आपल्या लेकीसाठी वेळ काढला. प्रियांकानं रविवार समुद्रकिनाऱ्यावर घालवला. आता तिन 10 जून रोजी याची झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. सोशल मीडियावर एक मनमोहक व्हिडिओ व्हायरल होत असून यात प्रियांका ही मुलगी मालतीबरोबर सुंदर समुद्रकिनारी आनंद घेताना दिसत आहे.
प्रियांका आणि मालतीचा बीचवरचा व्हिडिओ व्हायरल : व्हिडिओत प्रियांका आणि मालती बीचवर एन्जॉय करताना आहेत. यादरम्यान मालती वाळूशी खेळत असून ती तिच्या छोट्या हातात वाळू घेऊन समुद्राच्या पाण्यात टाकत आहे. याशिवाय ती बीचवर धावताना दिसते. दम्यान प्रियांकाही मालतीला फॉलो करते आणि तिची छोटीशी झलक कॅमेऱ्यात कैद करते. हा सुंदर क्षण शेअर करत देसी गर्लनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "अशा प्रकारचा रविवार. ग्रेटफुल." प्रियांकाची पोस्ट शेअर होताच सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया यावर येऊ लागल्या आहेत. बिपाशा बसूनं यावर कमेंट करत लिहिलं, 'डॉल' तसेच भूमी पेडणेकरची बहीण समिक्षानं या पोस्टवर लिहिलं, "खूप क्यूट."तसेच सोनाली बिंद्रेनं देखील पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.