मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून निवेदिता सराफ यांच्या 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' या मालिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या मालिकेत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' मालिकेत दोन प्रमुख कलाकारांव्यतिरिक्त आणखी कोण दोन कलाकर दिसणार आहेत. आता 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' या मालिकेचा नवीन एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये या दोन्ही कलाकारांचे चेहरे दाखविण्यात आले आहेत.
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!'चा नवीन प्रोमो रिलीज :'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' ही बहुप्रतीक्षित मालिका दुपारी प्रसारित होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर 2 डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी 2.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' मालिकेचा यापूर्वी एक प्रोमो रिलीज करण्यात आला होता. यामध्ये निवेदिता आणि मंगेश कदम हे दोघंही रिटायरमेंट नंतर आयुष्य कसं जगायचं यावर चर्चा करताना दिसले होते. आता नव्या प्रोमोमध्ये रिटायरमेंट झाल्यावर दुसऱ्याच दिवशी स्वत:साठी जगत असताना या जोडप्याची कहाणी दाखविण्यात आली आहे.
कसा आहे प्रोमो : प्रोमोच्या सुरुवातीला मंगेश कदम सायंकाळी जॉगिंगसाठी तयारी करताना दिसतात. यानंतर या जोडप्याच्या नातीला घेऊन त्यांचा मुलगा येतो. निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांच्या मुलाच्या भूमिकेत हरीश दुधाडे असणार आहे. पुढं प्रोमोमध्ये आई-बाबाला एकत्र जात असताना पाहून त्यांचा मुलगा आनंदी होतो. यानंतर निवेदिता सराफ आणि मंगेश कदम जॉगिंगला जायला निघणार, तर एवढ्यात अभिनेत्री प्रतिक्षा जाधवची एन्ट्री होते. या मालिकेत ती निवेदिता यांच्या सुनेची भूमिका साकारणार आहे. प्रोमोमध्ये पुढं प्रतिक्षा जाधव म्हणते, "एसी दुरुस्त करण्यासाठी एक माणूस येणार आहे, त्यामुळे तुम्ही घरी थांबा उद्यापासून जॉगिंगला जा..आम्ही शो पाहायला जात आहोत आणि फक्त तीनच तिकिटं आहेत." असं म्हणून ती सासूला खडसावून सांगते. यावर निवेदिता सराफ या जॉगिंगचा प्लॅन रद्द करून घरात थांबतात. आता ही मालिका किती प्रेक्षकांचं मन जिंकेल हे काही दिवसांत समजेल.
हेही वाचा :
- निवेदिता सराफ यांची नवीन मालिका 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत.' होणार 'या' दिवशी प्रसारित
- Indian Idol Marathi : निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे जागवणार नव्वदीच्या दशकातील गाण्याच्या आठवणी
- Birthday Celebrity Actress Nivedita Saraf : नवीन कलाकारांमध्ये फार प्रतिभा - अभिनेत्री निवेदिता सराफ