महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर, नताशा स्टॅनकोविकने मुलगा अगस्त्यसह दिली सर्बियातील संग्रहालयाला भेट - NATASA STANKOVIC - NATASA STANKOVIC

NATASA STANKOVIC : नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांनी 18 जुलै रोजी त्यांच्या विभक्तीची घोषणा केली. या घोषणेनंतर नताशा आपल्या मायदेशी निघून गेली आहे. सार्बियाला गेल्यानंतर ती मुलांबरोबर क्वालिटी टाईम घालवत आहे. याची अपडेट तिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे.

NATASA STANKOVIC AND SON AGASTYA
नताशा स्टॅनकोविक ((IANS photo))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 4:59 PM IST

मुंबई - NATASA STANKOVIC: सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविकने अलीकडेच तिचा पती भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यापासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. ही बातमी येण्यापूर्वी तिनं मुंबई सोडली आणि सर्बियातील तिच्या गावी त्यांचा मुलगा अगस्त्यसोबत परतली. सर्बियामध्ये परतल्यानंतर नताशानं तेथे अनुभवलेल्या आनंददायक आणि शांत क्षणांबद्दल सक्रियपणे अपडेट शेअर केली.

मुलगा अगस्त्यसह नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic's IG Story (Instagram))

सोमवारी, तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर तिच्या लहान मुलासह मजेदार सहलीचे प्रदर्शन करणारा फोटो आणि व्हिडिओंची एक स्ट्रिंग शेअर केली. यात नताशानं आणि अगस्त्यानं एका संग्रहालयाला भेट दिली.मुलाबरोबर काढलेल्या आनंदी फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिनं हृदय आनंदानं भरुन आल्याचं म्हटलंय.

मुलगा अगस्त्यसह नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic's IG Story (Instagram))

नताशा आणि हार्दिक यांनी 18 जुलै रोजी इन्स्टाग्रामद्वारे त्यांच्या विभक्त झाल्याची घोषणा केली होती. पोस्टमध्ये असे लिहिलं होतं की, "4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, नताशा आणि मी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्र प्रयत्न केले आणि आमच्या बाजूनं सर्व काही दिलं आहे. आम्हाला विश्वास आहे की हे आमच्या दोघांच्या हिताचे आहे," असं पोस्टमध्ये म्हटलं होतं.

मुलगा अगस्त्यसह नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic's IG Story (Instagram))

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशाच्या लग्नात अडचणी तयार झाल्याचं दिसत आहे. दोघेही त्यांच्या आयुष्यासह पुढे जात असताना, हार्दिकनं अलीकडेच अभिनेत्री अनन्या पांडेच्याबरोबर बिनधास्त डान्स केला होता. हार्दिक आणि अनन्या अनंत अंबानीच्या लग्नात एकत्र नाचताना आणि आनंद लुटतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अफवा पसरू लागल्या. दोघांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना फॉलो करायला सुरुवात केल्याची माहिती मिळाल्यावर त्यांच्या नात्याभोवतीच्या अटकळ अधिक तीव्र झाल्या आहेत.

हार्दिकबरोबर नताशाच्या लग्नाआधी, ती टेलिव्हिजन अभिनेता अली गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि हे जोडपे रिअ‍ॅलिटी डान्स शो, 'नच बलिए'मध्ये देखील एकत्र दिसले होते.

हेही वाचा -

  1. हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर नताशा स्टॅनकोविचची पहिली सोशल मीडिया पोस्ट - Natasa Stankovic post
  2. हार्दिकच नाही तर 'या' क्रिकेटपटूंचाही झालाय घटस्फोट; खेळाडूंची नावं वाचून बसेल धक्का! - Hardik Natasa Divorce
  3. अखेर हार्दिक-नताशाचं नातं तुटलं; दोनदा लग्न करुनही चार वर्षांत मोडला 'संसार' - Hardik Natasa Divorce

ABOUT THE AUTHOR

...view details