मुंबई - Taapsee pannu :बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू पॅरिसमध्ये आहे. तिनं पॅरिसमधील काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ऑलिम्पिक 2024ची झलकही या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. भारतीय बॅडमिंटनपटू आणि पती -प्रशिक्षक मॅथियास बो यांना पाठिंबा देण्यासाठी तापसी ही बहीण शगुन पन्नूसह पॅरिसला पोहोचली आहे. तिनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरी आणि पोस्टवर सुंदर शहराची झलक शेअर केली आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ अनेकांना आवडत आहेत. हे फोटो शेअर करताना तापसीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "रानी इन पॅरिस." तसेच तिनं दुसऱ्या फोटोवर लिहिलं, "माय फॉरएव्हर डेट." तिचे हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
तापसी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये (तापसी पन्नू (Instagram)) तापसी पन्नूनं शेअर केले फोटो :तापसी पॅरिसमध्ये धमाल करताना फोटोत दिसत आहे. तिच्या फोटोवर अनेकजण कमेंट्स देऊन आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या फोटोंच्या कमेंट विभागात लिहिलं, "खूप सुंदर दिसत आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "मला तुझ साडीमधील लूक खूप सुंदर वाटलं आहे." याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून तिचे कौतुक करत आहेत.
तापसी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये (तापसी पन्नू (Instagram)) तापसीनं हातात तिरंगा घेऊन चिअर अप केलं : फोटोमध्ये तापसी स्टाईलिश साडीमध्ये दिसत आहे. यानंतर ती एका व्हिडिओमध्ये बहिण शगुनबरोबर फिरताना दिसत आहे. यानंतर ती पती मॅथियासबरोबर डिनर डेटवर गेल्याचं दिसत आहे. तिनं तिच्या पतीचा एक फोटो शेअर केला आहे. यावर तिनं कॅप्शन दिलं, "ठीक आहे, आज त्याच्या चांगल्या कामासाठी त्याला डिनर ट्रीट देऊ." तसेच तिचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना हातात तिरंगा घेऊन चिअर अप करताना दिसत आहे. या दोन्ही भारतीय बॅडमिंटनपटूनं मंगळवारी इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांतो यांच्याविरुद्ध मॅच खेळली. दोन्ही खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत इंडोनेशियन खेळाडूंचा पराभव केला. बॅडमिंटन दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थेट आपले स्थान निश्चित केले. दरम्यान, तापसीनं साँड की ऑँख या चित्रपटात प्रकाशी तोमर या शूटरची भूमिका केली होती. अशातच ऑलिम्पिकमध्ये शूटर खेळाडुंनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे तापसीची साँड की ऑँख चित्रपटातील भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
हेही वाचा :
- तापसी पन्नू ,विक्रांत मॅसी आणि सनी कौशल स्टारर 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - PHIR AAYI HASSEEN DILLRUBA
- 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा ट्रेलर होईल उद्या प्रदर्शित, पोस्ट व्हायरल - PHIR AAYI HASSEEN DILLRUBA Movie
- तापसी पन्नू आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बोईच्या 'संगीत' कार्यक्रमाची ग्लॅमरस झलक, पाहा व्हिडिओ - Taapsee Pannu and Mathias Boe