महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'पाताल लोक 2'चा टीझर झाला रिलीज, जयदीप अहलावत पुन्हा इन्स्पेक्टरच्या भूमिकेत करणार जादू - PAATAL LOK 2 TEASER

'पाताल लोक 2'चा टीझर हा प्रदर्शित करण्यात आला आहे. आता सीरीजमध्ये पुन्हा एकदा जयदीप अहलावत धोकादायक नवीन केसचा सामना करणार आहे.

Paatal Lok 2 teaser out
'पाताल लोक 2'चा टीझर झाला रिलीज (Paatal Lok Season 2 Teaser Out (Photo: Series Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 3, 2025, 4:14 PM IST

मुंबई : प्राइम व्हिडिओनं वर्षाची सुरुवात एका चांगल्या पद्धतीनं केली आहे. आता 'पाताल लोक'चा मोस्ट अवेटेड दुसऱ्या सीझनचा टीझर 3 जानेवारी रोजी रिलीज करण्यात आला आहे. या सीझनबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. या वेब सीरीजचा पहिला सीझन सुपर डुपर हिट होता. आता सीझन 2 देखील हिट होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या वेब सीरीजमध्ये इन्स्पेक्टर हाथी राम चौधरीच्या भूमिकेतील जयदीप अहलावत एका नवीन प्रकरणाच्या तपासात व्यग्र असल्याचं टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

'पाताळ लोक 2'चा दमदार टीझर : टीझरच्या सुरुवातीला जयदीप अहलावत लिफ्टमध्ये असल्याचा दिसत आहे. या टीझरमध्ये जयदीप सांगतो, "तुम्हाला एक गोष्ट सांगू का ? एका गावात एक माणूस राहत होता. तो किटकांचा खूप राग करायचा. तो नेहमीच म्हणत होता की, सर्व वाईट गोष्टीचं मूळ हे किडे आहेत. यानंतर त्या माणसांच्या घराच्या कोपऱ्यातून एक किडा बाहेर येतो. तो किडा त्या माणसाला चावतो. तसेच तो माणूस हिम्मत करून त्या किड्याला मारून टाकतो. तो माणूस यानंतर आपल्या गावाचा हिरो बनतो. त्या माणसाला गावामध्ये मान मिळू लागतो. ही गोष्ट झाल्यानंतर प्रत्येक गावकरी खूप खुश होतो. यानंतर पुढची अनेक रात्र ते शांतपणे झोपतात. मात्र एका रात्री त्या माणसाच्या पलंगाखाली एक किडा येतो. यानंतर तिथे दहा किडे, हजार, लाख आणि खूप जास्त प्रमाणात किडे येतात. त्या माणसाला वाटलं होतं, त्यानं एक किडा मारला तर खेळ समाप्त होईल, पाताल लोकमध्ये असं थोडी होते."

'पाताळ लोक 2'ची स्टार कास्ट : टीझरमध्ये जयदीपच्या तोंडावर जखमेच्या खुणा देखील दिसत आहे. अविनाश अरुण धवरे दिग्दर्शित, 'पाताल लोक सीझन 2'मध्ये जयदीप अहलावत व्यतिरिक्त इश्वाक सिंग, तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर, गुल पनाग, आणि जाह्नू बरुआ सारखे दिग्गज कलाकार आहेत. ही सीरीज 17 जानेवारीपासून खास प्राइम व्हिडिओवर प्रसारित होईल. 'पाताल लोक सीझन 2'चे आठ भाग असणार आहेत. गुन्हेगारी, षड्यंत्र आणि भ्रष्टाचाराच्या जगातील गोष्टी यावेळी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. 'पाताल लोक 2'ची रिलीज डेट जाहीर, जाणून घ्या, कधी आणि कुठं दिसणार ही मालिका

ABOUT THE AUTHOR

...view details