मुंबई - 'पुष्पा' अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सलमान खानबरोबर आगामी 'सिकंदर' चित्रपटामध्ये दिसणार आहे. रश्मिका या चित्रपटासाठी खूप मेहनत करत आहे. सध्या रश्मिकाचं वेळापत्रक खूप व्यग्र आहे. 'पुष्पा 2' ब्लॉकबस्टर हिट चित्रपटानंतर, ती आता दुसऱ्या एका दमदार चित्रपटासाठी सज्ज आहे. मात्र रश्मिकाला सध्या तरी शूटिंग थांबवावी लागली आहे. जिममध्ये व्यायाम करताना तिला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी रश्मिकाला पूर्णपणे बरे होण्यासाठी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. बरी झाल्यानंतरच ती तिच्या चित्रपटाच्या शूटिंगला परत जाऊ शकते. रश्मिका मंदान्नाला दुखात झाल्यामुळे आता तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यामातून चिंता व्यक्त करत आहेत.
रश्मिका मंदान्ना झाली जखमी : एका ताज्या अपडेट्सवरून असं दिसून येत आहे की, ती बरी होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय ती लवकरच कामावर परत येईल. पुष्पा स्टारबद्दल तिच्या टीमनं सांगितलं की, "रश्मिकाला अलीकडेच जिममध्ये दुखापत झाली होती. यानंतर ती विश्रांती घेत आहे आणि बरी होत आहे." आता रश्मिकानं तिच्या आगामी प्रोजेक्ट्सचं शूटिंग काही काळासाठी पुढं ढकललं आहे. काही दिवसात रश्मिका आपल्या कामावर परत जाऊ शकते. रश्मिका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा आपल्या चाहत्याबरोबर नवीन पोस्ट शेअर करत असते.