महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नताशा स्टॅनकोविकनं मुलगा अगस्त्याबरोबर साजरा केला बालदिन, पोस्ट व्हायरल - NATASA STANKOVIC AND SON AGASTYA

नताशा स्टॅनकोविकनं बालदिनानिमित्त मुलगा अगस्त्याबरोबर एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

natasa stankovic and Hardik Pandya
नताशा आणि हार्दिक पांड्या (नताशा आणि हार्दिक पांड्या (IMAGE - IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 14, 2024, 5:28 PM IST

मुंबई -क्रिकेटर हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टॅनकोविकनं आज 14 नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त मुलाबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये नताशा मुलगा अगस्त्याबरोबर खूप मस्ती करताना दिसत आहे. यावेळी तिनं आपल्या मुलाला पाठीवर घेतलं आहे. हार्दिकपासून विभक्त झाल्यानंतर नताशा स्टॅनकोविक आपल्या मुलाबरोबर राहते. आता अनेकांना नताशानं शेअर केलेला हा व्हिडिओ आवडत आहेत. या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रया देत आहेत. नताशा स्टॅनकोविक अनेकदा आपल्या मुलाबरोबर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

नताशानं आपल्या मुलाबरोबर शेअर केला व्हिडिओ : नताशानं शेअर केलेल्या या व्हिडिओच्या पार्श्वभूमीत एक इंग्रजी गाणं वाजत आहे. या व्हिडिओत नताशा शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्ये दिसत आहे तर अगस्त्यानं डेनिम जंपसूट आणि डोक्यावर टोपी घातली आहे. दरम्यान नताशाच्या व्हिडिओवर एका यूजरनं 'बेस्ट मॉम' असं लिहिलं आहे. दुसरा यूजर लिहिल,'ब्रेव्ह मॉम.' आणखी एका यूजरनं लिहिले की, 'अगस्त्याला खूप नशीबवान आहे, त्याला सुंदर आई मिळाली आहे.' याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि स्माईली पोस्ट करून या दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

नताशाचं नाव दिशा पटानीच्या कथित बॉयफ्रेंडशी जोडले : नताशा आणि हार्दिकनं चालू वर्षात सोशल मीडियावर वेगळे होण्याची घोषणा करून त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का दिला होता. याशिवाय नताशा अगस्त्याबरोबर सर्बियातील तिच्या घरी गेली होती. यानंतर तिनं सर्बियामध्ये अगस्त्याचा वाढदिवस साजरा केला होता. नताशानं हार्दिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होत. यानंतर ती आपल्याबरोबर पुन्हा मुंबईत परत आली. सध्या नताशाचे नाव दिशा पटानीचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर ॲलेक्स इलिकशी जोडले जात आहे. अनेकदा हे दोघेही एकत्र स्पॉट होतात. याशिवाय काही दिवसापूर्वी नताशा आणि अलेक्झांडर हे जिमबाहेर स्पॉट झाले होते. याशिवाय नताश आता आपल्या करिअरकडे लक्ष देत आहे.

हेही वाचा :

  1. हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा स्टॅनकोविकनं मुलासाठी मौन सोडले...
  2. नताशा स्टॅनकोविच मित्र अलेक्झांडर ॲलेक्सबरोबर डिनर डेटवर झाली स्पॉट, व्हिडिओ व्हायरल
  3. दोनदा लग्न करुनही सिंगल, वर्षाला कमावतो कोट्यवधी रुपये; 'बर्थडे बॉय' हार्दिकची कशी आहे कारकीर्द?

ABOUT THE AUTHOR

...view details