मुंबई - अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची तारीख उघड झाली आहे. दोघांचा साखरपुडा धूमधडाक्यात पार पडला होता. आता नागा आणि शोभिता लवकरच लग्न करणार आहेत. साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूशी घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य शोभिताशी डेटिंग करत होता. आता दोघेही सात फेरे घेऊन लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ८ ऑगस्टला नागा आणि शोभिताच्या एंगेजमेंटने चाहत्यांमध्ये उत्साह संचारला होता. आता या जोडप्याच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाचं लग्न कधी? - मिळालेल्या माहितीनुसार नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा विवाह चालू वर्षातच होणार आहे. यााठी जोडप्याच्या चाहत्यांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही. नागा आणि शोभिताचे लग्न 4 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. नागा आणि शोभिताच्या लग्नाला कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच नागार्जुनचे वडील अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी नागार्जुनने आपली भावी सून शोभिताची ओळख साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांना करुन दिली होती.