महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोट केल्यानंतर नताशानं मुलाबरोबर 'असा' वाढदिवस केला साजरा - Natasa Stankovic share pics - NATASA STANKOVIC SHARE PICS

Natasa Stankovic: नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांचा मुलगा अगस्त्य हा 30 जुलै रोजी 4 वर्षांचा झाला. या विशेष प्रसंगी नताशानं सोशल मीडियावर यापूर्वीही कधी न शेअर केलेले फोटो पोस्ट केले आहेत. तिनं आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Natasa Stankovic
नताशा स्टॅनकोविक (Photo - (ANI))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jul 31, 2024, 12:43 PM IST

मुंबई - Natasa stankovic:अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांनी मंगळवारी, 30 जुलै रोजी त्यांचा मुलगा अगस्त्यचा वाढदिवस साजरा केला. दोघांनीही आपल्या लाडक्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच नताशानं तिच्या मुलाबरोबरचे काही खास झलक शेअर केल्या आहेत. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

30 जुलै रोजी रात्री उशिरा नताशानं तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट आणि स्टोरीवर मुलगा अगस्त्यबरोबरचे न पाहिलेले फोटो शेअर करून त्याला सुंदर सप्राईज दिलंय. इन्स्टा स्टोरीवर ही सुंदर फोटो शेअर करताना तिनं लिहिलं, "हॅपी बर्थडे बुबा, मी नेहमी तुझ्याबरोबर असेन." काही फोटोंमध्ये नताशा तिच्या मुलाबरोबर कॅमेऱ्यासाठी पोझ देताना दिसत आहे. तर एका फोटोत अगस्त्य पेंटिंग दाखवताना दिसत आहे.

नताशा स्टॅनकोविकची पोस्ट :नताशानं अगस्त्यबरोबरच्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "माय बुबा, तू माझ्या आयुष्यात शांती, प्रेम आणि आनंद आणलास. माझा गोड मुलगा, खरंच तू माझ्यासाठी वरदान आहेस. तू नेहमीच असाच राहा. मी नेहमी तुझा हात धरून तुझ्याबरोबर असेन. मी तुझ्यावर खूप प्रेम करते." आता या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून फोटो सुंदर असल्याचं म्हणत आहेत. याशिवाय काहीजण नताशाला हार्दिकपासून मुलाला दूर करू नको, असल्याचं म्हणताना दिसत आहेत. तसेच हार्दिकनं देखील 30 जुलै रोजी आपल्या मुलाबरोबरचे घालवलेले खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

हार्दिक पांड्याची पोस्ट :क्लिप शेअर करताना हार्दिकनं यावर लिहिलं, "तू मला दररोज पुढे जाण्यास मदत करतो. माय पार्टनर इन क्राइम, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्यावर खूप प्रेम आहे." नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या 31 मे 2020 रोजी लग्नाच्या बेडीत अडकले होते. या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केलं होतं. 30 जुलै 2020 रोजी हे जोडपे एका मुलाचे पालक झाले. यानंतर 18 जुलै रोजी या दोघांनी एकमेकांपासून वेगळे होत असल्याची अधिकृत घोषणा केली. यानंतर अनेकांना याबाबत धक्का बसला होता.

हेही वाचा :

  1. हार्दिक पांड्यानं मुलाच्या वाढदिवसानिमित्त केली हृदयस्पर्शी पोस्ट, पाहा व्हिडिओ - Natasa Hardik Son Birthday
  2. हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर, नताशा स्टॅनकोविकने मुलगा अगस्त्यसह दिली सर्बियातील संग्रहालयाला भेट - NATASA STANKOVIC
  3. हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर नताशा स्टॅनकोविचची पहिली सोशल मीडिया पोस्ट - Natasa Stankovic post

ABOUT THE AUTHOR

...view details