मुंबई - Mothers Day 2024 :भारतीय संस्कृतीत आईला देवांपेक्षा वरचे स्थान दिलं गेलं आहे. आज 12 मार्च रोजी मातृदिन आहे. या दिवशी लोक त्यांच्या आईबद्दल विशेष प्रेम आणि आदर व्यक्त करतात. आपण आपल्या आईला प्रेम आणि आदर देण्यासाठी कोणत्याही एका दिवसावर अवलंबून नाही. फिल्मी दुनियेनेही पडद्यावर आईची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या भूमिकेन चाहत्यांची मनं जिंकले आहेत.
- निरूपा रॉय :अभिनेत्री निरुपा रॉय ही 70 आणि 80 च्या दशकातील अभिनेत्रीनं प्रेमळ आईची भूमिका साकारला. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण केलं होत. फिल्मी दुनियेत तिची ओळख आई म्हणून आहे. निरुपा रॉयनं जवळपास प्रत्येक नायकाच्या आईची भूमिका साकारली आहे. 'दीवार' चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या आईची भूमिका साकारली होती. दीवारमधील मेरे पास माँ हे, हा डायलॉग प्रचंड गाजला होता.
- राखी : अभिनेत्री राखीनं तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलंय. शाहरुख आणि सलमान खानच्या 'करण अर्जुन' या चित्रपटात तिनं आईची अशी भूमिका साकारली होती. ही भूमिका अनेकांना आवडली होती. आजही हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या डोळ्यात अश्रू येतात. या चित्रपटामध्ये राखीनं सुंदर अभिनय केला होता.
- रीमा लागू :अभिनेत्री रीमा लागूनं अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. 'हम साथ साथ हैं' चित्रपटातील तिची आईची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 'कयामत से कयामत तक', 'मैने प्यार किया' आणि 'कल हो ना हो' सारख्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारून तिनं अनेकांचं मनं जिंकले आहेत.
- फरीदा जलाल :अभिनेत्री फरीदा जलालनं हिंदी चित्रपटांमध्ये आईची भूमिका अनेकदा साकारली आहे. 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे'मध्ये त्यांनी काजोलच्या आईची भूमिका उत्कृष्टपणे साकारली होती. 'कुछ कुछ होता है', 'कहो ना प्यार है' अशा अनेक चित्रपटांमध्ये तिनं आईची भूमिका केली आहे.
- जया बच्चन : अभिनेत्री जया बच्चन यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घातली होती. जया यांनी अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. 'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना हो' यांसारख्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका केल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.