मुंबई - Natasha Dalal Baby Shower : अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यापैकी एक आहेत. या दोघांनी 2021 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या 3 वर्षानंतर नताशानं तिच्या गर्भधारणेची घोषणा केली. दरम्यान शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतनं 21 एप्रिल रोजी तिच्या सोशल मीडिया हँडलवर नताशा दलालच्या सुंदर बेबी शॉवरमधील फोटो शेअर केला आहे. मीरानं या बेबी शॉवरमधील आकर्षक झलक शेअर करत या पोस्टवर लिहिलं, "अभिनंदन व्हीडी आणि नताशा." शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा टेडी बेअर असलेला केक दिसत आहे. याशिवाय केकवर खूप सुंदर गुलांबाची डिझाईन आहे.
वरुणनं धवन केला होता फोटो शेअर :या वर्षाच्या सुरुवातीला वरुण धवननं पत्नी नताशाच्या गरोदरपणाची बातमी अधिकृतपणे जाहीर केली होती. त्यानं एक मोनोक्रोमॅटिक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो त्याची पत्नी फोटोसाठी पोझ देताना दिसत होते. फोटोमध्ये वरुणनं नताशाच्या बेबी बंपल किस दिलं होत. हा फोटो शेअर करताना वरुणनं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, "आम्हाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमाची गरज आहे, माझे कुटुंब ही माझी ताकद आहे." यानंतर वरुणच्या अनेक चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. याशिवाय त्याला अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या होत्या.