महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सुश्मिता सेनच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेलेब्रिटींनी केला शुभेच्छांचा वर्षाव - SUSHMITA SEN BIRTHDAY

अभिनेत्री सुश्मिता सेनच्या वाढदिवसानिमित्त तिला अनेक सेलेब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये शिल्पा शेट्टी, रकुल प्रित सिंग यासारख्या कलाकारांचा समावेश आहे.

celebrities wished Sushmita Sen
सुश्मिता सेनला शिल्पा शेट्टीच्या शुभेच्छा (ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2024, 4:26 PM IST

मुंबई - सुष्मिता सेन मंगळवारी 19 नोव्हेंबर रोजी तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या चाहत्यांबरोबरच फिल्म इंडस्ट्रीतील तिचे सहकारी आणि सेलेब्रिटी कलाकार तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या सौंदर्यवतीला प्रेम आणि आशीर्वाद पाठवणाऱ्या अनेक सेलिब्रिटींमध्ये शिल्पा शेट्टी देखील आहे. शिल्पा शेट्टीनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सुष्मिताबरोबरचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. तिने फोटोबरोबरच एक छान संदेश दिला आहे.

सुश्मिता सेनला शिल्पा शेट्टीच्या शुभेच्छा (ANI)

"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सुश! हे वर्ष तुला अनंत प्रेम, अमर्याद आनंद, तेजस्वी आरोग्य आणि अनंत आशीर्वाद घेऊन येवो. तू तारकेसारखी चमकत रहा!," असं शिल्पानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

सुश्मिता सेनला रकुल प्रितच्या शुभेच्छा (ANI)

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने सुष्मितासाठी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सुषच्या सुंदर फोटोसह एक गोड संदेश पोस्ट केला आहे. "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुश्मिता सेन! तुमचा दिवस प्रेमानं, हास्यानं भरलेला आणि अविस्मरणीय क्षणांनी जावो. हे वर्ष आरोग्य, आनंद आणि यशाचे जावो!" असं तिनं पोस्टमध्ये म्हटलंय.

सुष्मिता सेन हिनं 1994 मध्ये इतिहास रचला होता. ती 18 व्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली भारतीय बनली होती. तिच्या या यशानंतर सुष्मितासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले गेले. 1996 मध्ये 'दस्तक' चित्रपटाद्वारे तिन रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'बीवी नंबर 1', 'मैं हूं ना', 'आँखे' सारख्या सिनेमांमध्ये ती झळकली होती.

दरम्यान, सुष्मिताने अलीकडेच लॅक्मे फॅशन वीक X FDCI 2024 मध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यामध्ये तिनं डिझायनर राशी कपूरसाठी शोस्टॉपर म्हणून रेड कार्पेटवर दमदार पावलं टाकली होती.दरम्यान, ती तिच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

कामाच्या आघाडीवर, सुष्मिता सेन प्रशंसित मालिका "आर्या" मध्ये अखेरची दिसली होती. या मालिकेला समीक्षकांची प्रशंसा आणि आंतरराष्ट्रीय एमी नामांकन मिळालं होतं. या मालिकेच्या तिसऱ्या सीझनचा पहिला भाग 2023 मध्ये प्रीमियर झाला आणि दुसरा भाग फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसारित झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details