महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बाबा सिद्दीकींच्या मृत्यूची केआरकेनं उडवली खिल्ली? नेमकं काय म्हणाला? वाचा सविस्तर

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर केआरकेनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टमधून केआरकेनं बाबा सिद्दीकींच्या मृत्यूची खिल्ली उडवल्याचं बोललं जातंय.

KRK offensive post on social media after Baba Siddiqui death
केआरके, बाबा सिद्दीकी (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2024, 1:28 PM IST

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी (12 ऑक्टोबर) रात्री गोळीबार झाला. तीन अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी मिळताच अभिनेता सलमान खान, संजय दत्त, झहीर इक्बाल, शिल्पा शेट्टी या बॉलिवूड स्टार्सनं हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पण अशातच आता केआरकेनं सोशल मीडियावर केलेली पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

केआरकेनं काय म्हटलंय? :केआरकेनं बाबा सिद्दीकींच्या हत्येची बातमी समोर आल्यानंतर एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यानं "जसे करावे तसे भरावे, कोणास ठाऊक कितीजणांच्या प्रॉपर्टी हडप केल्या आहेत", असं म्हटलंय. केआरकेच्या या पोस्टनंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं. तसंच यावरुन अनेक युझर्सनं नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता केआरकेनं अजून काही पोस्ट लिहित आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. तो म्हणाला, "अगोदर छोटा राजन डी कंपनीत काम करत होता. त्यानंतर ते शत्रू झाले. आधी अबू सलीम डी कंपनीत काम करत होते. त्यानंतर ते शत्रू झाले. हे सांगायचं कारण असं की, जर तुम्ही गुंडांसोबत काम करत असाल तर एक दिवस तुम्ही तुमच्याचं मित्रांचा निशाणा बनू शकतात."

  • पुढं केआरकेनं म्हटलंय की, "अतीक अहमद, अशरफ अहमद, शहाबुद्दीन, मुख्तार अन्सारी, असे अनेक गुंडांचं गेल्या काही वर्षांत निधन झालं. तेव्हा हे लोक त्यांच्यासाठी रडले नाहीत. पण, जर अशा आणखी एका माणसाचा मृत्यू जो केवळ मोजक्या कलाकारांना ओळखत होता. तर बरेच लोक रडू लागतील."

हेही वाचा -

  1. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती, पोलिसांकडून तत्काळ सलमान खानच्या सुरक्षेत वाढ
  2. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी राहुल गांधी यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारनं जबाबदारी...”
  3. बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर बडा कब्रस्तानमधील स्मशानभूमीत होणार दफन विधी

ABOUT THE AUTHOR

...view details