महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कोलकाता नाईट रायडर्सनं सामना जिंकल्यानंतर शाहरुख खान झाला खूश, चाहत्यांकरिता दिली सिग्नेचर पोझ - Shah rukh Khan signature pose - SHAH RUKH KHAN SIGNATURE POSE

KKR vs SRH: शाहरुख खानचा संघ कोलकाता नाईट रायडर्स (KKR)नं सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना जिंकून अंतिम फेरीतील आपले स्थान पक्क केलंय. सामना जिंकताच किंग खाननं मैदानात येऊन त्यांची सिग्नेचर पोझ देऊन चाहत्यांचे आभार मानले आहेत.

KKR vs SRH
कोलकाता नाईट रायडर्स vs सनरायझर्स हैदराबाद (शाहरुख खान (IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 11:10 AM IST

Updated : May 22, 2024, 12:09 PM IST

मुंबई - KKR vs SRH : सनरायझर्स हैदराबादवर आठ गडी राखून विजय मिळवल्यानंतर, केकेआरनं मंगळवारी आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत जागा निश्चित केली. 21 मे रोजी हैदराबादविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर 'किंग खान'नं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची मुलगी सुहाना खान आणि मुलगा अबराम खान दिसत आहे. याशिवाय यावेळी शाहरुख खाननं सिग्नेचर पोझ देऊन चाहत्यांना पुन्हा एकदा खुश केलं आहे. मैदानावर फिरताना त्यानं चाहत्यांचे आभार मानले आहेत. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांनी 'किंग खान'ला मिठी मारली.

शाहरूख खानचं केलं कौतुक :व्यंकटेश अय्यरनं शाहरूखच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. त्यानं म्हटलं, "पडद्यावर त्यांच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना मी नेहमीच पाहिलं आहे. मात्र फक्त ते फ्रेंचायझीचे मालकचं नाही, तर ते आमच्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. ते सतत आम्हाला मार्गदर्शन करत राहतात." यानंतर श्रेयस अय्यरनंही शाहरुखचे कौतुक करत म्हटलं, "त्याच्या उपस्थितीमुळे संघाच्या वातावरणात उत्साह येतो. संघाचा दृष्टिकोन आपोआप बदलतो. मैदानात उतरल्यानंतर प्रत्येकाला योगदान द्यावेसे वाटते." कोलकाता नाईट रायडर्सनं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. हा संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकेल अशी अपेक्षा 'किंग खान'चे चाहते करत आहेत.

केकेआर चौथ्यांदा अंतिम फेरी दाखल :कोलकाता नाईट रायडर्स संघानं अंतिम फेरीत जबरदस्त परफॉर्म केलं. सनरायझर्स हैदराबादला केकेआरनं 20 व्या षटकात एकूण 159 धावांवर रोखले. केकेआरनं आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. हा सामना केकेआरसाठी खूप महत्वाचा होता. दरम्यान शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'डंकी' या चित्रपटामध्ये तापसी पन्नूबरोबर दिसला होता. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाला होता. आता पुढं तो 'किंग', 'पठान 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो 'टाइगर वर्सेस पठान' चित्रपटामध्ये सलमान खानबरोबर स्किन शेअर करताना दिसेल.

हेही वाचा :

  1. करण जोहरच्या आगामी चित्रपटात आयुष्मान आणि साराची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार - AYUSHMANN AND SARA ALI KHAN
  2. मिसेस माही जान्हवी कपूरचं क्रिकेट बॉल हॅन्ड बॅगमधील क्लीन बोल्ड लूक व्हायरल - mrs mahi janhvi kapoor
  3. 'या' कारणामुळे संजय दत्तनं 'वेलकम टू द जंगल' चित्रपटातून घेतली माघार - sanjay dutt exits from welcome 3
Last Updated : May 22, 2024, 12:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details