मुंबई - Shreyas Reunites with Tusshar : श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर मुख्य कलाकार म्हणून 'कपकपी' या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपटात काम करत असून निर्मात्यांनी गुरुवारी याची घोषणा केली. यासाठी त्यांनी चित्रपटाच्या शीर्षकाचे मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आलं.
सौरभ आनंद आणि कुमार प्रियदर्शी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. यापूर्वी 'क्या कूल हैं हम' आणि 'अपना सपना मनी मनी' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या संगीत सिवन यांनी याही चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. थ्रिलर आणि देशभक्तीपर चित्रपटांची लाट आल्यानंतर हा एक हलका फुलका चित्रपट घेऊन निर्माता जयेश पटेल मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.
श्रेयस तळपदेनं याबाबत शेअर केलं की, "चित्रपटातील गडदपणा आणि देशभक्तीपर थीमचाचा सुरू असलेला ड्रेंड लक्षात घेऊन हा एक अस्सल हॉरर कॉमेडी प्रेक्षकांच्या विविध आवडीनिवडी पूर्ण करून हास्य आणि भिती यांचे मिश्रण असलेला हा मनोरंजक चित्रपट आहे." अलिकडेच डिसेंबर 2023 मध्ये श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर अँजिग्राफीची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यानं गोलमालचा सहकलाकार तुषार कपूर आणि दिग्दर्शक सिवन यांच्यासोबत पुन्हा एकत्र येत असल्याबद्दलचा आनंद व्यक्त केला होता.