मुंबई - Kalki 2898 AD on OTT Release : प्रभास, दीपिका, अमिताभ बच्चन स्टारर सायन्स-फिक्शन चित्रपट 'कल्की 2898 एडी' बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. हा चित्रपट 2024 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला आहे. नाग अश्विन दिग्दर्शित पौराणिक ॲक्शन ड्रामा 27 जून रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं अवघ्या 16 दिवसांत जगभरात 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पौराणिक कहाणी आणि सायन्स-फिक्शन यांचा अप्रतिम संगम असलेला 'कल्की 2898 एडी' पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी आता देखील करत आहेत. हा चित्रपट ओटीटीवर देखील प्रदर्शित होणार आहे.
'कल्की 2898 एडी' ओटीटीवर होणार रिलीज :रिपोर्ट्सनुसार, 'कल्की 2898 एडी'चे निर्माते चित्रपटगृहांमध्ये रिलीजच्या 10 आठवड्यांनंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्याची योजना आखत आहेत. म्हणजेच हा चित्रपट सप्टेंबरच्या सुरुवातीला ओटीटीवर प्रवाहित होऊ शकतो. प्राइम व्हिडिओ इंडिया तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळमसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये हा चित्रपट प्रसारित करेल. तसेच नेटफ्लिक्स इंडिया हिंदी आवृत्ती प्रदर्शित करेल. निर्मात्यांनी अद्याप ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजची तारीख अधिकृतपणे घोषीत केलेली नाही. हा चित्रपट आता लवकरच ओटीटीवर रिलीज होईल, असा अनेकजण अंदाज लावत आहेत.