महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'मध्ये अंकिता आणि वर्षाताई यांच्यात टास्क दरम्यान होईल लढत, नवीन प्रोमो व्हायरल - bigg boss marathi - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' हा शो आता शेवटच्या टप्यात आला आहे. या शोचा आता एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये अंकिता वालावलकर आणि वर्षा उसगावकर यांच्या लढत पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Bigg Boss Marathi 5 - Instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2024, 6:01 PM IST

मुंबई Bigg Boss Marathi 5 :'बिग बॉस मराठी 5' हा शो सुरू होऊन 50 दिवसांहून अधिक काळ झाला आहे. आता या घरातून एक-एक स्पर्धक कमी होत आहे. घरातील सदस्यांमध्ये अधिक स्पर्धा पाहायला मिळत आहे. नुकताच या घरातून अरबाज पटेल हा बाहेर पडला, यानंतर निक्की तांबोळी आता आपल्या पद्धतीनं घरात गेम खेळताना दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सध्या खूप चर्चेत आहे. आता नुकतेच 'बिग बॉस'नं यंदाचा सीझन हा 70 दिवसांमध्ये संपणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान या शोच्या ग्रँड फिनालेसाठी फक्त 2 आठवडे बाकी आहेत.

अंकिता आणि वर्षाताईमध्ये लढत :सध्या घरातील प्रत्येक स्पर्धक आपले स्थान निश्चित करण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहेत. 'बिग बॉस'च्या घरात प्रत्येक आठवड्यात एक नवीन टास्क पार पडत असतो. आता यावेळी घरात प्रेक्षकांना नवा खेळ पाहायला मिळणार आहे. आज 25 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये घरात लगोरीचा खेळ खेळला जाईल. लगोरीचा खेळ काहीशा हटके पद्धतीनं खेळण्यात येईल. या टास्कसाठी 8 सदस्य दोन गटांमध्ये विभागले जातील. दरम्यान 'बिग बॉस' निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर एक प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये अंकिता वालावलकर आणि वर्षा उसगावकर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळत आहे. या खेळामध्ये निक्की देखील वर्षाताईला प्रोत्साहित करताना दिसत आहे.

घरात होईल खेचाखेची :या खेळामध्ये घरातील सदस्यांमध्ये चांगलीच खेचाखेची होताना दिसणार आहे. आता या मजेदार टास्कमध्ये कोण बाजी मारेल, हे आजच्या एपिसोडमध्ये समजेल. 'बिग बॉस मराठी 5'च्या घरात आता अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगावकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे आठ सदस्य शिल्लक आहेत. फिनाले अवघ्या काही दिवसांवर आहे. या आठवड्यात हे सगळे सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. त्यामुळे घरातील अनेक सदस्य घाबरून आहेत. याशिवाय घरातील सदस्य सध्या खेळाबद्दल एकमेकांबरोबर चर्चा करताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी'चा महाअंतिम सोहळा हा 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. आता ग्रँड फिनालेमध्ये कोण ट्रॉफी उंचावणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'चा नवीन प्रोमो रिलीज, घरातील सदस्यांना 'बिग बॉस'च्या घोषेनंतर वाटली भीती - bigg boss marathi
  2. 'बिग बॉस मराठी 5'मधून अरबाज पटेल घरातून गेल्यानंतर सूरज चव्हाणनं दिला निक्की तांबोळीला पाठिंबा - bigg boss marathi
  3. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये पंढरीनाथ कांबळेनं वर्षा उसगावकरला कॅप्टन्सी टास्कदरम्यान चांगलच सुनावलं, प्रोमो व्हायरल - Bigg Boss Marathi 5

ABOUT THE AUTHOR

...view details