मुंबई - Bigg Boss17 Grand Finale :लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17'चा लवकरच विजेता समोर येणार आहे. सलमान खानचा शो अंतिम टप्प्यात आहे. या शोमध्ये आता 5 फायनलिस्ट बाकी आहेत. मुनावर फारुकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण महाशेट्टी यांच्यापैकी कोणाला' बिग बॉस 17'च्या विजेत्याची ट्रॉफी मिळेल याबद्दल चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. 'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहायचा? याशिवाय विजेत्याची बक्षीस रक्कमही किती दिली जाणार, याबद्दल जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी वाचा.
'बिग बॉस 17' चा ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहायचा : अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी, अभिषेक कुमार, अरुण महाशेट्टी आणि मन्नारा चोप्रा यांच्यात आता खूप स्पर्धा वाढली आहे. 'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले कलर्स टीव्हीवर 28 जानेवारीला होणार आहे. सलमान खान रविवारी या शोच्या विजेत्याची घोषणा करणार आहे. संध्याकाळी 6 ते 12 पर्यंत या शोचा 6 तासांचा भव्य फिनाले होणार आहे. कलर्स टीव्हीशिवाय हा शो तुमच्या फोनवर ऑनलाइन देखील तुम्ही पाहू शकता. 'बिग बॉस 17' शो जीओ सिनेमावर दिसणार आहे. 'बिग बॉस 17' लाईव्हवर क्लिक करून या सीझनचा तुम्हाला मोफत आनंद घेऊ शकता. शोच्या विजेत्याच्या बक्षीस रकमेबद्दल बोलायचं झालं तर, विनरला ट्रॉफीसह 50 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, मात्र याबद्दल पुष्टी झालेली नाही. कारण प्रत्येकवेळी शोमध्ये फिनालेपूर्वी सूटकेस ट्विस्ट दिसून येतो. यामध्ये द्वितीय विजेत्याला शोमधून बॅकआउट करण्यासाठी काही पैसे ऑफर केले जातात. जर हे पैसे त्यानं स्वीकार केला तर शोचा विजेता लगेच घोषीत केला जातो. यानंतर द्वितीय विजेत्याला 10 लाख रुपये देण्यात येतात, ही रक्कम विजेत्या घोषित केलेल्याच्या बक्षीस रकमेतून कापली जाते.