मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'च्या महाअंतिम सोहळ्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. येत्या 6 ऑक्टोबर रोजी 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता अवघ्या महाराष्ट्रासमोर येईल. आता अनेक चाहते या शोच्या ग्रँड फिनालेची वाट पाहात आहेत. सध्या 'बिग बॉस'च्या घरात एकूण 8 स्पर्धक आहेत. 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धा सध्या अटीतटीची झाली आहे. सर्वच स्पर्धक केव्हाही न खेळलेला गेम खेळताना घरात दिसत आहेत. आता सोशल मीडियावर एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये घरातील सदस्य एक नवीन टास्क करताना दिसत आहेत.
पंढरीनाथ कांबळे आणि सूरज चव्हाणचा संघर्ष : ह्या टास्कमध्ये स्पर्धकांना अंतिम रक्कम जिंकण्यासाठी महाचक्रव्युह पार करावं लागणार आहे. या महाचक्रव्यूह टास्कसाठी काही जोड्या तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये सूरज चव्हाण आणि पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे यांची जोडी असल्याची प्रोमोमध्ये दिसत आहे. या दोघांमध्ये खास नातं प्रेक्षकांनी अनुभवलं आहे. यानंतर हेच नात त्यांना या टास्कदरम्यान वापरायचे आहे. आता व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये महाचक्रव्यूह टास्कदरम्यान पॅडी सूरजला मार्गदर्शन करत आहे. पॅडी यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज हा टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. या टास्कसाठी मर्यादित वेळ आहे. यात त्यांना हा टास्क पूर्ण करायचा आहे.