मुंबई- National Siblings Day 2024 : नॅशनल सिबलिंग्स डे हा खूप विशेष दिवस आहे, दरवर्षी 10 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. मदर्स डे आणि फादर्स डे यासारख्या खास दिवसांप्रमाणेच नॅशनल सिबलिंग्स डे अनेकजण मोठ्या थाटात साजरा करतात. या दिवशी, तुम्ही आणि लहान, मोठ्या बंधू आणि बहिणींवर प्रेम व्यक्त करू शकता. हा दिवस अनेक बॉलिवूड स्टार्स मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुरानानं नॅशनल सिबलिंग्स डेनिमित्त एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याचा मोठा भाऊ आयुष्मान खुरानाबरोबर नाचताना दिसत आहे.
अपारशक्ती खुराना आणि आयुष्मान खुराना : अपारशक्ती खुरानानं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला व्हिडिओ पाहण्यासारखा आहे. नॅशनल सिबलिंग्स डेनिमित्त शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो त्याच्या भावाबरोबर 'काल तेरी छोटी' गाण्यावर डान्स करत आहे. त्याचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. आयुष्मान आणि अपारशक्ती जेव्हा डान्स करतात, त्यांचा डान्स पाहण्यासाठी लहान मुले देखील तिथे बसलेली असतात. हा व्हिडीओ पाहून कुणालाही हसायला येऊ शकतं. अपारशक्तीनं व्हिडिओ शेअर करत या पोस्टवर लिहिलं, ''होय, हे नेहमीच वेड्यांचं घर राहिले आहे. नेशनल सिबलिंग्स डेच्या शुभेच्छा.''