मुंबई - Article 370 trailer OUT : हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री यामी गौतम पुन्हा एकदा देशाच्या ज्वलंत प्रश्नावर चित्रपट घेऊन बॉक्स ऑफिसवर पुनरागमन करत आहे. याआधी ती 'उरी - सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात दिसली होती आणि आता ती काश्मीरमधील विवादित कलम 370वर आधारित चित्रपटात दिसणार आहे. 'आर्टिकल 370' चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. 8 फेब्रुवारी रोजी, 'आर्टिकल 370' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केलंय.
'आर्टिकल 370'चा ट्रेलर रिलीज : 'आर्टिकल 370'च्या निर्मात्यांनी आज ट्रेलर रिलीज करून प्रपोज डेच्या दिवशी चाहत्यांनी एक भेट दिली आहे. झी स्टुडिओनं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'आर्टिकल 370'चं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''एक ऐतिहासिक पाऊल. ज्यानं देश बदलवला. कलम 370 चा ट्रेलर रिलीज. 'आर्टिकल 370' 23 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.'' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये संसदची झलक दिसत असून यामी गौतम आणि साऊथ अभिनेत्री प्रियामणि राज दिसत आहेत. याशिवाय पोस्टरमध्ये यामीच्या हातात मशीनगन आहे. 'आर्टिकल 370'चा ट्रेलर पाहून अनेकजण यामीला तिच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.