मुंबई :गायक अरमान मलिक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आशना श्रॉफ यांनी आज, 2 जानेवारी रोजी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अरमान मलिक आणि आशना श्रॉफ यांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलंय. नवविवाहित जोडप्यानं सोशल मीडियावर त्यांच्या खास दिवसाची एक झलक शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी चाहत्यांना एक भेट दिली आहे. गुरुवारी अरमान मलिक आणि आशना श्रॉफ यांनी इंस्टाग्रामवर एक संयुक्त पोस्ट शेअर करून सर्वांना गोड बातमी दिली. आता सध्या सोशल मीडियावर या जोडप्याच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहे. त्याचे फोटो त्याच्या चाहत्यांना देखील खूप पसंत पडत आहेत.
गायक अरमान मलिकनं केलं लग्न :लग्नातील फोटो शेअर करताना अरमाननं कॅप्शनमध्ये 'तू माझे घर आहेस' असं लिहिले आहे. अरमाननं इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, यामध्ये तो वर्माला घातल असताना त्याच्या नववधूबरोबर मस्ती करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्यानं यावर लिहिलं, 'मस्ती करणे कधी थांबवू नये.' दरम्यान अरमाननं शेअर केलेल्या फोटोवर अनेक चाहते त्याला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. याशिवाय वरुण धवन, दिया मिर्झा, टायगर श्रॉफ, ईशा गुप्ता, दिव्यांका त्रिपाठी, कृती खरबंदा, रिया चक्रवर्ती, मृणाल ठाकूर, कुशा कपिला यांच्यासह अनेक स्टार्सनी नवविवाहित जोडप्याच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.