मुंबई Anushka Sharma Birthday : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आज 1 मे रोजी आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे. अनुष्का शर्माच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते सोशल मीडियावर फोटो शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याशिवाय काही चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील तिला या विशेष दिवसावर शुभेच्छा देताना दिसत आहेत. अनुष्का 6 वर्षांपासून एकाही चित्रपटात दिसली नाही. सध्या ती आपल्या मुलांना संपूर्ण वेळ देत आहे. अनुष्का शेवटी 'काला' (2022) या चित्रपटात एका खास कॅमिओ भूमिकेत दिसली होती. याआधी ती शाहरुख खानच्या 'झिरो' (2018) या चित्रपटात झळकली होती. याशिवाय ती 2018 मध्ये 'सुई धागा' या चित्रपटामध्ये वरुण धवनबरोबर दिसली होती. याचं वर्षी ती 'परी' आणि रणबीर कपूर स्टारर 'संजू' चित्रपटात झळकली होती.
अनुष्का शर्मा 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटात दिसणार : अनुष्का शर्मा ही सध्या स्पोर्ट्स बायोग्राफीकल 'चकडा एक्सप्रेस'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा 4 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. हा चित्रपट पूर्ण तयार झाला आहे, मात्र अद्याप प्रदर्शित झालेला नाही. या चित्रपटात अनुष्का शर्मा महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर कधी प्रदर्शित होईल, याबद्दल कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र अनुष्काचे चाहते तिच्या या आगामी चित्रपटाची वाट खूप आतुरतेनं पाहात आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रॉसिट रॉय यांनी केलं आहे.