मुंबई- अनुष्का शर्माचा यंदाचा करवा चौथ खास ठरला. विराट आणि अनुष्का शर्मा हे सेलेब्रिटी जोडपं कीर्तनाला हजर राहिलं होतं. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये 'विरुष्का' भजनात दंग झाल्याचं दिसत आहेत.
20 ऑक्टोबर रोजी, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली मुंबईच्या नेस्को येथील अमेरिकन गायक कृष्णा दासच्या कृष्णा कीर्तनमध्ये सामील झाले. या कार्यक्रमाचा थेट आनंद घेत असताना या जोडप्याला कॅमेर्यात कैद करण्यात आलं. यामध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर एक आनंद दिसून येत आहे. यामध्ये विराटनं भजनात टाळ्यांनी साथ दिली असून अनुष्का भजनाच्या स्तोत्रात तल्लीन होऊन कीर्तनाचा आनंद घेताना दिसली.
अनुष्का क्रीम रंगाच्या को-ऑर्ड सेटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. यावेळी विराटनं पूर्ण-स्लीव्ह टी-शर्ट, ब्लू डेनिम पँट आणि रेड कॅपसह स्टाईलमध्ये हजर होता. अनुष्कानंही या कीर्तन सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून यातून दोघांचीही आध्यात्मिक श्रद्धा दिसून येत आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे जोडपं कीर्तनामध्ये सामील होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जुलैच्या सुरूवातीस, या पॉवर जोडप्याने लंडनमध्ये अशाच एका कार्यक्रमात भाग घेतला. जूनमध्ये भारताच्या टी -20 विश्वचषक विजेतेपदानंतर कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडून ब्रेक घेतला तेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता.
अभिनेत्री अनुष्का शर्मा खूप काळापासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. ती 'झीरो' या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दिसली होती. या चित्रपटात तिनं शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांच्याबरोबर स्क्रिन स्पेस शेअर केली होती. 2018 मध्ये आलेल्या या चित्रपटानंतर ती 2022 मध्ये 'कला' या ओटीटीवर रिलीज झालेल्या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसली होती. ती आगामी 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटात झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे. विराट कोहलीचा विचार करता तो अलीकडेच भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यामध्ये 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात खेळला गेला होता. यातील पहिल्या डावात तो शून्यवर बाद झाला होता. दुसऱ्या डावात त्यानं 70 धावांची खेळी केली, परंतु भारतानं हा सामना गमवला होता.