मुंबई Anant Radhika Wedding Guest List :अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा आज (12 जुलै) मुंबईच्या वांद्रे-कुर्ला सेंटरमधील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडणार आहे. त्यांच्या या विवाह सोहळ्याला महाराष्ट्रासह देशभरातील अनेक नेते, बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठे सेलिब्रिटी, उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंसह नेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम हेदेखील अंबानींच्या विदेशी पाहुण्यांच्या यादीत आहेत. याशिवाय, कॅनेडियन गायक ड्रेक, अमेरिकन गायिका लाना डेल रे आणि ॲडेल हे देखील या शाही विवाह सोहळ्यासाठी हजर राहू शकतात.
राजकारणातील 'या' नेत्यांना निमंत्रण : राजकारणातील विविध प्रमुख नेत्यांना देखील या शाही सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलंय. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवारालादेखील उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालंय. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन, टोनी ब्लेअर, कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर, अमेरिकेचे माजी विदेश मंत्री जॉन केरी, यांच्यासह विविध नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बॉलिवूड 'हे' सितारे राहणार हजर :लग्नापूर्वी अंबानींच्या निवासस्थानी झालेल्या विशेष शिवशक्ति पूजा कार्यक्रमात कोकिलाबेन अंबानी, अनिल अंबानी, टीना अंबानी, अभिनेता संजय दत्त, शनाया कपूर, अनन्या पांडे सहभागी झाले होते. बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन, किंग खान शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, शाहिद कपूर, दीपिका पदुकोन, कॅटरिना कैफ, प्रियांका चोप्रा, निक जोन्स, रणवीर कपूर, आलिया भट्ट, अमीर खान यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक सिताऱ्यांना या लग्नासाठी निमंत्रित करण्यात आलंय.
परदेशी पाहुण्यांचीही हजेरी :अनंत-राधिकाच्या या शाही विवाह सोहळ्यासाठी किम कार्दिशियन (हॉलिवूड अभिनेत्री) बहिण ख्लोक कार्दिशियनसह गुरुवारी मुंबईत दाखल झाली. तर जॉन सीना यांच्यासोबत माइक टायसन, काल्म डाउन हिटमेकर आणि जीन-क्लॉड व्हॅन डॅमे यांसारखे इतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीदेखील या लग्न समारंभात सामील होणार असल्याचं समोर आलंय.
- अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळ तीन दिवस चालणार आहे. 12 जुलैला त्यांच्या विवाह सोहळा पार पडेल. त्यानंतर 13 जुलैला वधू-वरांना शुभ आशिर्वाद देण्यात येतील. तर 14 जुलैला रिसेप्शन होईल. तर या लग्नासाठी दिग्गजांची मांदियाळी पाहता संपूर्ण जगाचं लक्ष या सोहळ्याकडं असणार आहे.
हेही वाचा -
- 100 जेट, हजारो NSG कमांडो तैनात; अनंत-राधिकाच्या शाही लग्नाची तयारी पूर्ण, 'या' शुभ मुहूर्तावर वरमाला विधी - Anant Radhika wedding
- अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नामुळे मुंबईत रस्त्यावर नाकाबंदी, सामान्य नागरिकांना फटका - ANANT AND RADHIKA WEDDING
- ओरीनं रणवीर सिंगसमोर दीपिका पदुकोणच्या बेबी बंपवर ठेवला हात, फोटो व्हायरल - ranveer deepika