मुंबई- HRITHIK ROSHAN : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने त्याची गर्लफ्रेंड सबा आझादच्या 'मिनिमम' या चित्रपटाचं समर्थन केलं आहे. या चित्रपटाने 26 व्या यूके आशियाई चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ होत आहे. अभिनेता हृतिक रोशन आपली जोडीदार आणि गायिका सबा हिच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कधीही मागे हटत नाही. अलीकडेच, यूके आशियाई चित्रपट महोत्सव सुरू होताना त्याने 'मिनिमम' चित्रपटासाठी त्याच्या प्रेयसीचं कौतुक केलं.
सबा आझादचा चित्रपट युके फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकतोय याचा आनंद हृतिक लपवू शकला नाही. त्याने अलीकडेच सबा आणि तिच्या मिनिमम चित्रपटातील कलाकारांचे कौतुक केले. इन्स्टाग्रामवर हृतिकने सबाच्या चित्रपटाची प्रशंसा करताना तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. लंडनमध्ये 26 व्या यूके आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरुवात होणाऱ्या सबाच्या चित्रपटाचे पोस्टर ह्रतिकने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट केले आहे.
त्याच्या प्रेयसीसाठी आणि 'मिनिमम' चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी हृतिक रोशनने लिहिले, " स्वर वादक वाजवताना पाहण्याचा आनंद. हे आश्चर्यकारक असेल." या चित्रपटाचे दिग्दर्शन रुमाना मोल्ला या नवोदित दिग्दर्शकाने केले आहे. सबा व्यतिरिक्त चित्रपटात नमित दास, गीतांजली कुलकर्णी, रुमाना, नसीरुद्दीन शाह आणि सबा यांच्या भूमिका आहेत.