मुंबई - Alia Ranbir Wedding Anniversary : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी 14 एप्रिलला लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. दरम्यान आलियानं पती रणबीरबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या पोस्टवर तिनं कॅप्शन देत लिहिलं, ''आनंदाची 2 वर्षे. हे आमच्यासाठी माझं प्रेम आहे. आज आणि आजपासून अनेक वर्षांसाठीचं प्रेम.'' शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये रणबीर आलियाच्या पाठीशी उभा आहे, तर दुसऱ्यामध्ये 'अप' या ॲनिमेटेड चित्रपटातील कार्ल आणि एली ही लोकप्रिय पात्रे दाखवली आहेत. आलियानं आयुष्याची तुलना 'अप' मधील कार्ल आणि एलीच्या आयुष्याशी केली आहे.
आलिया लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्त केले फोटो शेअर :आलियानं शेअर केलेल्या फोटोवर अनेकजण आता कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं या फोटोवर कमेंट करत लिहिलं, "आलिया तू शेअर केलेला फोटो खूप सुंदर आहे, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा." दुसऱ्या एकानं लिहिलं, ''दोघांची खूप सुंदर जोडी आहे.'' आणखी एकानं लिहिलं, "लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. तसेच काल नीतू कपूरनेही आलिया आणि रणबीरला लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिनं शेअर केलेल्या पोस्टवर कॅप्शनमध्ये लिहिलं होत, 'आशीर्वाद' याशिवाय दोन लाल रंगाचे हार्ट देखील या पोस्टवर जोडले होते.