महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

लोकप्रिय यूट्यूबर कॅरी मिनाटीला सॉरी म्हणायला भाग पाडल्यानंतर एजाज खान झाला ट्रोल - ajaz khan trolled

Ajaz khan Vs Carry Minati: 'बिग बॉस 7' फेम एजाज खाननं लोकप्रिय यूट्यूबर कॅरी मिनाटीला सॉरी म्हणण्यास भाग पाडल्यानंतर त्याला आता अनेकजण ट्रोल करत आहेत. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यात कॅरी आणि एजाज हे एका शॉपिंग मॉलमध्ये दिसत आहेत.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 5:36 PM IST

Ajaz khan Vs Carry Minati
एजाज खान vs कॅरी मिनाटी ((IMAGE- INSTAGRAM Ajaz and Carry Minati))

मुंबई - Ajaz khan and carry minati :'बिग बॉस 7' फेम एजाज खान त्याच्या वादग्रस्त शैलीमुळे प्रसिद्ध आहे. आता यावेळी एजाज खूप विचित्र कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा आणि लोकप्रिय यूट्यूबर अजय नागर उर्फ कॅरी मिनाटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॅरी मिनाटीनं काही वर्षांपूर्वी त्याच्या यूट्यूबर एजाज खानला रोस्ट केलं होतं. अलीकडे एजाज आणि कॅरी मिनाटी आमनेसामने आले. यानंतर एजाजचं कठोर रुप पाहायला मिळालं. एजाजनं कॅरी मिनाटीला माफी मागण्यास सांगितलं. आता कॅरीचे चाहते इजाजला प्रचंड ट्रोल करत आहेत.

एजाज खान झाला ट्रोल :एजाज खाननं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कॅरी मिनाटीचा माफी मागतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एजाज कॅरीला एका शॉपिंग मॉलमध्ये भेटतो. यामध्ये एजाज कॅरीला सांगतो की, "प्रत्येक बिलात हात घालू नको बेटा, काहीमध्ये साप पण असतो. आता माझ्या चाहत्यांना आणि मला सॉरी म्हण." यावर कॅरी मिनाटी म्हणतो, "सर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मला माफ करा." हा व्हिडीओ शेअर करत एजाज खाननं लिहिलं आहे, "मी माझ्या मुलाला आणि माझ्या चाहत्यांना वचन दिले होते आणि मी ते आज पूर्ण केले."या व्हिडिओला साडेचार लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. इंस्टाग्रामवर एजाज खानला 5 मिलियनहून अधिक चाहते फॉलो करतात. या व्हिडिओवरून कॅरीचे चाहते एजाजला ट्रोल करत आहेत.

कॅरी मिनाटीला दिला चाहत्यांनी पाठिंबा : कॅरीच्या एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं आहे की, "चार वर्षांनंतर सॉरी म्हणायला आठवलं याला." दुसरा चाहता लिहिलं, "एखाद्याला सॉरी म्हणण्याचा हा वाईट मार्ग आहे." आणखी एकानं लिहिलं, "ही गुंडगिरी आहे, तुम्ही एखाद्याला अचानक भेटल्यावर माफी मागण्यास भाग पाडत आहात" ट्रोल झाल्यानंतर एजाज खाननं कमेंट सेक्शन बंद केलं आहे. एजाज खान 'बिग बॉस 7'मध्ये स्पर्धक म्हणून दिसला होता. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्येही दिसला. कॅरीबद्दल बोलायचं झालं तर त्याचे इंस्टाग्रामवर 21 दशलक्षाहून अधिक चाहते आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details