मुंबई - अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. दोघांनीही घटस्फोटाबाबत पुष्टी केलेली नाही. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, दोघेही नुकतेच आराध्याच्या शाळेत धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक दिवसाच्या कार्यक्रमात पोहोचले होते. आता सोशल मीडियावर त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात ऐश, अभिषेक आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसत आहेत. आराध्याच्या शाळेत वार्षिक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक स्टार्सनं हजेरी लावली होती. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहेत.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय दिसले एकत्र : या व्हिडिओंच्या पोस्टमध्ये अनेक यूजर्स आता कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये शाळेच्या गेटमधून प्रवेश करतानाचा अभिषेक बच्चन हा ऐश्वर्याची काळजी घेताना दिसत आहे. यावेळी अभिषेक हा ऐशच्या पाठीवर हात ठेवून समोर जात आहे. आता अभिषेकची ही काळजी पाहून अनेक यूजर्स त्यांना एकत्र राहण्याचा सल्ला देत आहेत. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये एका चाहत्यानं लिहिलं, 'सासू आणि नणंदची नजर लागली नाही पाहिजे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'या दोघांना एकत्र पाहून खूप छान वाटलं.' आणखी दुसऱ्या एकानं लिहिलं, 'मला खूप चांगलं वाटलं हे दोघे एकत्र आहे.' याशिवाय काहीजण या व्हिडिओच्या पोस्टमध्ये फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.