मुंबई - देशभरात सर्वत्र दिवाळीची लगभग सुरू आहे, हा सण मोठ्या आनंदानं आणि जल्लोषात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये अनेकांकडे फराळ हा बनविल्या जात असतो. दिवाळीच्या सुट्टीमध्ये आजूबाजूचं वातावरण देखील प्रसन्न असते. सामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रिटी देखील या दिवसांमध्ये आपल्या कुटुंबरोबर विशेष वेळ घालवत असतात. शूटिंगमधून ब्रेक घेऊन सेलिब्रिटी दिवाळीचा सण कुटुंबीयांबरोबर साजरा करत असतात. आता काही मराठी कलाकरांनी फराळ बनवायला सुरुवात केली आहे. मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरच्या घरी दिवाळीचं फराळ बनविल्या जात आहे.
ऐश्वर्या नारकर यांच्या पतीनं केल्या दिवाळीसाठी करंज्या :ऐश्वर्या सध्या एका मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. यानंतर तिचा पती अविनाश नारकर यांनी फराळ बनवण्याची सुरुवात केली आहे. अविनाश यांनी सोशल मीडियावर करंज्या बनवतानाचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते स्वत:च्या हातानं करंज्या बनवून तळताना दिसत आहे. अविनाश यांनी या व्हिडिओच्या पोस्टवर लिहिलं, 'चला चला या या या... सगळयांनी फराळाला या....!! मी,ऐश्वर्या आणि आमच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला या मंगलमय , तेजोमय दिवाळी आणि नवीन वर्षांच्या खूप खूप खूप मनापासून शुभेच्छा....!!' आता अविनाश यांच्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.