मुंबई - Aftab Shivdasani :अभिनेता आफताब शिवदासानीचा कॉमेडी चित्रपट 'वेलकम टू जंगल'मध्ये एंट्री झाली आहे. त्यानं शूटिंग क्लॅप बोर्ड आणि चित्रपटाचा मुख्य अभिनेता अक्षय कुमारबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. आफताब आणि अक्षय कुमार 16 वर्षांनंतर एकत्र चित्रपट करणार आहेत. याआधी ही जोडी 'आवारा पागल दिवाना' चित्रपटात एकत्र दिसली होती. आता आफताब हा 'वेलकम टू द जंगल 'चा भाग असणार आहे. आफताबनं शेअर केलेले फोटो खूप मजेदार आहेत. 16 वर्षांनंतर दोन्ही स्टार्सच्या चेहऱ्यात काहीही बदल झालेले नाही.
'वेलकम टू द जंगल' चित्रपटात आफताबची एंट्री : आफताबनं ही आनंदाची बातमी शेअर करत पोस्टमध्ये लिहिलं, "इस 'दीवाना' का इस 'पागल' जंगल में 'स्वागत' करने के लिए 'आवारा' को धन्यवाद." या चित्रपटाची घोषणा सप्टेंबर 2023 मध्ये झाली होती. यानंतर चित्रपटाचं शीर्षक 'वेलकम टू द जंगल' ठेवण्यात आलं होतं. 'वेलकम टू द जंगल' चित्रपटामध्ये जवळपास 25 कलाकार आहेत. आता हे स्टार्स प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करताना दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये अक्षयबरोबर त्याची एक्स गर्लफ्रेंड रवीना टंडन देखील दिसणार आहे.'वेलकम टू द जंगल' चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान करत आहे. या चित्रपटाची निर्मिती जिओ प्लॅटफॉर्म्स कंपनी करत आहे.