मुंबईRamadan Eid wishes: देशभरात आज 11 एप्रिल रोजी रमजान ईदचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्सही त्यांच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यामातून देत आहेत. याशिवाय अभिनेता सलमान खाननेही आपल्या चाहत्यांना ईदसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता बॉलिवूडमधील काही सुंदर अभिनेत्रींनी फोटो शेअर करून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
- सोनाक्षी सिन्हा :रमजान ईदच्या निमित्तानं सोनाक्षी सिन्हानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, "ईद मुबारक." या फोटोमध्ये सोनाक्षीनं मरून रंगाचा लेहेंगा घातला आहे. ती संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी द डायमंड बाजार' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे.
- मन्नारा चोप्रा :हिंदी चित्रपटसृष्टीची देसी गर्ल प्रियांका चोप्राची चुलत बहीण आणि अभिनेत्री मन्नारा चोप्रानेही तिच्या चाहत्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात. तिनं सुंदर ड्रेसमध्ये तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, "जगभरात ईद साजरी करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा, चला मला आता ईदचं गिफ्ट द्या." शेअर केलेल्या फोटोमध्ये मन्नारा खूप सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोवर अनेकजण कमेंट्स करून तिचं कौतुक करत आहेत.
- आमना शरीफ : अभिनेत्री आमना शरीफनं सुंदर पाकिस्तानी पोशाखातील फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना थक्क केलं आहे. निळ्या आणि सोनेरी रंगाच्या पाकिस्तानी पोशाखात आमनानं चाहत्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा लूक अनेकांना आवडला आहे.
- सोहा अली खान :बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहीण सोहा अली खान खेमूनं सुंदर लाल अनारकली सूटमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिच्याबरोबर तिची मुलगी इनाया नौमी खेमू देखील दिसत आहे. या पोस्टवर सोहानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "ईद मुबारक."
- रश्मिका मंदान्ना आणि शिल्पा शेट्टी :साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनीही त्यांच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
- नम्रता शिरोडकर : साऊथ सुपरस्टार महेश बाबूची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकरनं तिच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नम्रतानं घराच्या टेरेसवर सुंदर फोटो क्लिक केले आहेत. तिनं हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर केले आहेत.