महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नात दुआच्या तिसऱ्या महिन्याच्या वाढदिवशी रणवीर सिंगच्या आईनं केले केस दान...

रणवीर सिंगच्या आईनं नात दुआच्या तिसऱ्या महिन्याच्या वाढदिवशी केस दान केले आहे. आता त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ranveer singhs mother anju bhavnani
रणवीर सिंगची आई अंजू भवनानी (रणवीर सिंगची आई अंजू भवनानी (ANI))

By ETV Bharat Entertainment Team

Published : 5 hours ago

मुंबई: बॉलिवूडचे पॉवरपॅक कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची मुलगी दुआ 8 डिसेंबरला 3 महिन्यांची झाली. या जोडप्यानं 8 सप्टेंबर रोजी आपल्या लेकीचं या जगात स्वागत केलं. रणवीरची आई अंजू भवनानी यांनी बाळाच्या तिसऱ्या महिन्याच्या वाढदिवशी आपले केस दान केले आहेत. अंजू भवनानी यांचे सोशल मीडियावर केस दान करण्याचे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच पापाराझीनं त्याच्या इंस्टाग्रामवर अंजू भवनानीचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोत अंजू यांनी त्यांचे केस 4 वेण्यांमध्ये विभागले आहेत.

रणवीरच्या आई अंजू भवनानी यांनी केले केस दान :दरम्यान रणवीरच्या आईनं देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करताना लिहिलं की, 'माझ्या लाडक्या दुआला तिच्या तिसऱ्या महिन्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा खास दिवस प्रेम आणि आशेनं साजरा करत आहोत. जेव्हा आपण प्रार्थनेचा आनंद आणि सौंदर्य पाहतो, तेव्हा आपल्याला चांगुलपणा आणि दयाळूपणाच्या शक्तीची आठवण होत असते. आशा आहे की हे छोटेसे काम कठीण परिस्थितीतून जात असलेल्या गरजूंना दिलासा आणि आत्मविश्वास देईल.'

दीपिका पदुकोण आणि रणवीर यांचं लग्न :काही दिवसांपूर्वीच दीपिका पदुकोण मुलगी दुआबरोबर कॅमेऱ्यात कैद झाली होती. ती मुंबईतील खासगी विमानतळावर दिसली होती. यावेळी दीपिकानं लाल रंगाचा सूट घातला होता. तिनं आपल्या मुलीचा चेहरा हातांनी झाकून घेतला होता. दरम्यान दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचं लग्न 14 आणि 15 नोव्हेंबर 2018मध्ये इटलीतील लेक कोमो येथे झाले. लग्नाच्या सहा वर्षानंतर या जोडप्यानं त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले. दरम्यान दुआचा जन्म झाल्यानंतर दीपिका आणि रणवीरनं एक पोस्ट शेअर करून आपला आनंद व्यक्त केला होता. याशिवाय यापूर्वी देखील दीपिकानं आपल्या मुलीच्या पायाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. तिनं शेअर केलेल्या फोटोच्या पोस्टवर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देऊन दुआवर प्रेमचा वर्षाव केला होता.

हेही वाचा :

  1. रणवीर सिंगनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी दीपिका पदुकोणसाठी शेअर केली आकर्षक पोस्ट...
  2. रणवीर सिंगनं वडील झाल्याचा आनंद रिलायन्स इव्हेंटमध्ये केला व्यक्त, व्हिडिओ व्हायरल - Ranveer Singh
  3. मजबूत शरीरसौष्ठवासह रणवीर सिंगनं सुरू केली 'डॉन 3'ची तयारी, पाहा व्हायरल फोटो - Ranveer Singh Don 3

ABOUT THE AUTHOR

...view details