मुंबई - Kartik aaryan :अभिनेता कार्तिक आर्यनचे अनेक चाहते आहेत. आपल्या अभिनयाबरोबरच तो सुंदर लूकनेही अनेकांचे मने जिंकत असतो. कार्तिकचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहेत. आता पुन्हा एकदा त्याच्या डेटींगसंबंधित एक अपडेट समोर आली आहे. कार्तिक हा फार काळ कोणाला डेट करत नाही, तो प्रेमपासून दूर राहतो. आता अलीकडेच तो रिलेशनशिपबद्दल बोलला आहे. त्यानं जाहीर केलं आहे की, तो आता आपल्या आयुष्यात कोणाला तरी खास स्थान देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्यानं मुलगी शोधण्याची जबाबदारी बी-टाउनमधील सुंदर अभिनेत्री नेहा धुपियाला सोपवली आहे.
कार्तिक आर्यन प्रेमात पडायला तयार :'नो फिल्टर नेहा' शोच्या फिनाले एपिसोडमध्ये कार्तिक आर्यन गेस्ट म्हणून आला होता. 'नो फिल्टर नेहा सीझन 6' च्या एका मजेदार सेगमेंटमध्ये नेहानं कार्तिकला विचारले की तो सिंगल आहे का? रिलेशनशिपसाठी तयार आहे का? यावर त्यानं म्हटलं, ''सध्या मी पूर्णपणं सिंगल आहे. खूप दिवस झाले. मी कोणाबरोबर रिलेशनशिपमध्ये नव्हतो. हे थोडं क्लिच उत्तर आहे. पण खरं तर मी माझ्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटावर लक्ष केंद्रित करत होतो. त्यानंतर त्यानं पुढं सांगितलं, ''बरेच वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये फिरल्यानंतर आता मला प्रेमासाठी वेळ मिळाला आहे. नेहा तू माझ्यासाठी कोणीतरी शोध.''