मुंबई -अभिनेता अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या यशामुळे सध्या चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. दरम्यान आता अल्लू अर्जुनची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. त्याच्या पोस्टमध्ये त्यानं चाहत्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भाषा वापरू नये अशी विनंती केली आहे. रविवारी 22 डिसेंबर रोजी इंस्टाग्रामवर त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
अल्लू अर्जुनची पोस्ट ? : साऊथ स्टार अल्लू अर्जुननं पोस्टमध्ये लिहिलं, "मी माझ्या सर्व चाहत्यांना त्यांच्या भावना नेहमीप्रमाणे जबाबदारीनं व्यक्त करण्याचे आवाहन करत असून ऑनलाईन आणि ऑफलाईन कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भाषा किंवा वर्तन करू नये यांची विनंती करतो." यानंतर त्याच्या पोस्टवर अनेक यूजर्सनं आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, 'आम्ही तुमच्याबरोबर आहे. अण्णा.' दुसऱ्या एकानं लिहिलं, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो, तुमचा कठीण काळ निघून जाईल.' आणखी दुसऱ्या एकानं लिहिलं, 'लव्ह यू पुष्पा.' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केले आरोप : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी 4 डिसेंबर रोजी हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल विधान केलं होत. यात महिलेच्या मृत्यूप्रकरणी तेलंगणा विधानसभेत अल्लू अर्जुनवर अनेक गंभीर आरोप केले गेले होते. पोलिसांची परवानगी नसतानाही अल्लू अर्जुन 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2' पाहण्यासाठी गेला होता, हा आरोप मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला होता. यानंतर अल्लू अर्जुननं शनिवारी संध्याकाळी त्यांच्या ज्युबली हिल्स येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी अर्जुननं विधानसभेत लावण्यात आलेले सर्व आरोप नाकारले. याशिवाय तो पत्रकार परिषदच्या वेळी भावूक झाल्याचा देखील दिसला होता. तसेच अल्लू अर्जुननं चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या रेवतीच्या कुटुंबाची आणि तिचा जखमी मुलगा श्रीतेज यांची माफी मागितली. दरम्यान तेलंगणा विधानसभेत रेवंत रेड्डी आणि अकबरुद्दीन ओवेसी यांनी नुकत्याच केलेल्या विधानांवर स्पष्टीकरण दिलंय.