महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

विक्रांत मॅसी स्टारर 'ट्वेल्थ फेल' चीनमध्ये 20 हजार स्क्रिन्सवर होणार रिलीज - 12th fail - 12TH FAIL

12th Fail : दिग्दर्शक विधू विनोद यांचा 'ट्वेल्थ फेल' हा लवकरच चीनमध्ये रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट चीनमध्ये 20000 स्क्रिनवर दिसणार आहे.

12th Fail
ट्वेल्थ फेल

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 4:45 PM IST

मुंबई - 12th Fail :बॉलिवूड अभिनेता विक्रांत मॅसी स्टारर हिट चित्रपट 'ट्वेल्थ फेल'नं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 25 आठवडे राज्य केलं होतं. दरम्यान 'ट्वेल्थ फेल' या चित्रपटाबाबत एक बातमी समोर आली आहे. हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. एका मुलाखतीत विक्रांत मॅसीनं 'ट्वेल्थ फेल' चित्रपटाविषयी सांगताना म्हटलं होत की, 'ट्वेल्थ फेल'चे निर्माते आता चीनमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. हा चित्रपट चीनमध्ये 20 हजारांहून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून यावर काम सुरू आहे." चीनमध्ये हिंदी चित्रपटांना मोठी मागणी आहे.

'ट्वेल्थ फेल' होणार चीनमध्ये रिलीज : या चित्रपटाची निर्मिती विधू विनोद चोप्रा यांनी केली आहे. हा चित्रपट आयपीएस मनोज कुमार शर्मा यांचा संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटाचा रन टाईम 2 तास 26 मिनिटांचा आहे. या चित्रपटामध्ये विक्रांत मॅसी व्यतिरिक्त मेधा शंकर, अनंत विजय जोशी,प्रियांशु चॅटर्जी, अंशुमान पुष्कर, विकास दिव्याकिर्ति, बिशनोई, हरीश खन्ना, सरिता जोशी, विजय कुमार डोग्रा, सोनल झा, गीता सोधी हे कलाकार आहेत. हा चित्रपट 20 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तिप्पट कमाई म्हणजेच 60 कोटी कमावले. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आता हा चित्रपट चीनमध्ये देखील कमाई करण्यासाठी सज्ज झाला आहे.

पुरस्कारांची यादी

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार - विधू विनोद चोप्रा

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट समीक्षक अभिनेता पुरस्कार - विक्रांत मेस्सी

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार - विधू विनोद चोप्रा

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार - विधू विनोद चोप्रा

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संपादन पुरस्कार - विधू विनोद चोप्रा, जसकुंवर सिंग कोहली

झी सिने सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार - विधू विनोद चोप्रा, विकास दिव्यकीर्ती, अनुराग पाठक

डेब्यू परफॉर्मर ऑफ द इयर- मेधा शंकर

झी सिने पुरस्कार - सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन - प्रशांत बिडकर

हेही वाचा :

  1. आमिर खाननं त्याच्या फेक व्हिडिओविरोधात एफआयआर केली दाखल, निवेदनही केलं जारी - Aamir Khan
  2. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या 'फकिरा'ची शौर्यगाथा भाऊराव कऱ्हाडे आणणार रुपेरी पडद्यावर - Fakira movie launch
  3. रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल'वर टीका करणाऱ्यांना विद्या बालनचं सडेतोड उत्तर - VIDYA BALAN

ABOUT THE AUTHOR

...view details