काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावरून एनडीए सरकावर टीका केली. चिदंबरम म्हणाले, " मला आंध्र प्रदेश आणि बिहारमधील त्यांच्या (एनडीए) आघाडीच्या भागीदारांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या राजकीय मजबुरी कळतात. त्यांनी आमच्या जाहीरनाम्यातून शिकाऊ योजनेसारख्या घोषणा केल्या आहेत."
एनडीएमधील मजबुरीमुळे आंध्रसह बिहारच्या मागण्या पूर्ण- चिदंबरम यांचा भाजपावर निशाणा - Budget 2024 live updates
Published : Jul 23, 2024, 8:49 AM IST
|Updated : Jul 23, 2024, 1:45 PM IST
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारपासून अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होणार आहे. लोकसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या व्यवसाय सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीत अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी 20 तासांचा अवधी देण्यात आला आहे.
LIVE FEED
एनडीएमधील मजबुरीमुळे आंध्रसह बिहारच्या मागण्या पूर्ण- चिदंबरम यांचा भाजपावर निशाणा
तेलंगणा, पंजाब आणि पश्चिम बंगालसाठी काय केले आहे- शत्रुघ्न सिन्हा
तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली ".कर्करोगावरील औषधांवर औषधांवर दिलेला दिलासा कौतुकास्पद आहे. बिहारला निधी देण्याची गरज होती. त्यासाठी निधी दिल्यानं चांगले वाटले. अपेक्षेप्रमाणंआंध्र प्रदेशसाठीही दिलं आहे. पण तेलंगणा, पंजाब आणि पश्चिम बंगालसाठी काय केले आहे?
स्टार्टअपवरील एंजेल कर रद्द-अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
टीडीएस वेळेत भरला नाही तर अपराध होणार नाही. प्राप्तिकराची रचना सोपी होणार आहे. आयटीआर फाईल्सची रचना सोपी होणार आहे. विवाद से विश्वास २०२४ योजना सादर केला जाणार आहे. कराबाबतचे वाद सहा महिन्यांमध्ये सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. स्टार्टअपवरील एंजेल कर रद्द होणार आहे.
काय स्वस्त होणार? अर्थमंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा
सीमाशुल्क दर कमी केले आहेत. पुढील सहा महिन्यात सीमाशुल्काची रचना करण्याचा आढावा घेण्यात येणार आहे. कर्करोगाकरिता वापरण्यात वैद्यकीय उपकरणांना सीमाशुल्कातून वगळण्यात आली आहे. कॅन्सरची ३ औषधांवरील सीमाशुल्क माफ करण्यात आले आहेत. कररचाना अधिक सुलभ करण्यात येणार आहे. देशांमध्ये मोबाईल उत्पादन वाढविण्यासाठी करांमध्ये सूट देण्यात येणार आहे. मोबाईल फोन आणि चार्ज आणि लिथीयम, बॅटरी, सोलार सेट्स स्वस्त होणार आहे. मोबाईल फोन आणि चार्जवरील शुल्क १५ टक्क्यांनी कमी केले आहे.
नव्या पेन्शन योजनेत बदल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू-अर्थमंत्री निर्मला सीतीरामन
विष्णूपथ आणि गया मंदिराचाही विकास करण्यात येणार आहे. दोन्ही मंदिरांमध्ये महाबोधी कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहे. नालंदा विद्यापीठ टूरिस्ट केंद्र सुरू करण्यातयेणार आहे. महिला आणि मुलींसाठी ३ लाख कोटींची योजना करण्यात येणार आहे. ओडिशात प्रमुख पर्यटन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्यांना १५ वर्षे व्याजमुक्त कर्जपुरवठा करण्या येणार आहे. विदेशात गुंतवणुकीसाठी भारतीय चलनाचा वापर करण्यात येणार आहे. एफडीआयच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. नव्या पेन्शन योजनेत बदल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
नैसर्गिक आपत्ती करण्याचा सामना करणाऱ्या राज्यांना केंद्र करणार विशेष मदत
मध्यम वर्गासाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. त्यातून शहरांमध्ये १ कोटी घरे बांधली जाणार आहेत. पीएम सूर्य १०० शहरांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये कपात करण्यात येणार आहे. देशातील २५ हजार गावे मुख्य रस्त्यांना जोडण्यात येमार आहेत. बिहार, हिमाचल प्रदेश आणि आसामला पुराचा फटका बसतो. त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडून मदत केली जाणार आहे. उत्तरांखडमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडतात. उत्तराखंडसाठी केंद्र सरकारकडून मदत करण्यात येणार आहे.
इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना महिना मासिक ५ हजार रुपये मदत देण्यात येणार, अर्थमंत्र्यांची घोषणा
देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी १० लाखापर्यंत मदत करण्यात येणार आहे. इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना महिना मासिक ५ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. त्यांना ५०० टॉप कंपन्यांमध्ये रोजगार देण्यात येणार आहे. देशात नवे उद्योग पार्क सुरू करण्यात येण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन करण्यात येणार आहे. मोबाईलचे सुट्टे पार्टस स्वस्त होणार आहे. सोने आणि चांदीदेखील स्वस्त होणार आहे. १५ बंदरांमध्ये उत्पादन होणाऱ्या माशांपासूनच्या उत्पादनांवरील करात सवलत देण्यात येणार आहे.
बिहार आणि आंध्रसाठी विशेष योजना जाहीर-अर्थमंत्री
कृषी उत्पादन वाढविण्यार भर दिला जाणार आहे. गरीब कल्याण योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ दिली जाणार आहे.
नव्या रोजगारनिर्मितीसाठी २ लाख कोटींची तरतूद करण्यात येणार
शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म
भाजीपाला वाहतुकीसाठी साखळी पुरवठा विकसित करण्यात येणार
कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात येणार
EPFO कर्मचाऱ्यांसाठी तीन नवीन योजना सुरू करण्यात येणार
पूर्वोत्तर राज्यांसाठी पूर्वोदय योजना राबविणार
बिहारमध्ये रस्ते बांधणीसाठी 26 हजार कोटींची तरतूद
बिहार आणि आंध्रसाठी विशेष योजना जाहीर
देशात नवे महामार्ग सुरू करण्यात येणार
कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद- अर्थमंत्री
कृषी उत्पादन वाढविण्यार भर दिला जाणार आहे. गरीब कल्याण योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ दिली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे.
भाजीपाला वाहतुकीसाठी साखळी पुरवठा विकसित करण्यात येणार
कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात येणार
4.1 कोटी तरुणांना रोजगार देण्याकरिता 5 योजना-अर्थमंत्री
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर करताना आनंद होत आहे. त्यासाठी 2 लाख कोटी रुपये खर्च होणार आहे. शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. "
जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जातानाही देशाची अर्थव्यवस्था प्रगती पथावर-निर्मला सीतारामन
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचं सादरीकरण सुरू केलं. त्यांनी सरकारच्या कामगिरीबाबत माहिती देण्यास सुरुवात केलं आहं. अर्थमंत्री म्हणाल्या," आमच्या सरकावर लोकांनी विश्वास दाखविला आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त एमएसपी देण्याचा प्रयत्न आहे. जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जातानाही देशाची अर्थव्यवस्था प्रगती पथावर आहे. महागाईमध्ये स्थिरता आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारकडून पाऊले उचलण्यात येत आहेत. गरीब, तरुण आणि महिलांचा अर्थसंकल्प आहे."
केंद्रीय अर्थमंत्री संसदेत पोहोचल्या, सोबत घेतला बजेट टॅब्लेट!
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट टॅब्लेट घेऊन संसदेत पोहोचल्या आहेत. यावेळी अर्थसंकल्पामधून कायम मिळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.
अर्थमंत्री सीतारामन यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची घेतली भेट
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. परंपरेनुसार अर्थमंत्र्यांनी संसदेत जाण्यापूर्वी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्प सादर करण्याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
निर्मला सीतारामन राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनकडे रवाना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाल्या आहेत.
मुंबई शेअर बाजारात उत्साह, निर्देशांक 229.89 अंकांनी वाढला!
आज अर्थसंकल्प सादर होत असताना मुंबई शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे. सकाळच्य सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 229.89 अंकांनी वाढून 80,731.97 वर पोहोचला.