हैदराबाद Benefits Of Walking : चालणं ही सुदृढ शरीराची गुरुकिल्ली आहे. पूर्वी प्रत्येकजण शारीरिक श्रम करत असत, परंतु सध्यस्थिती काही वेगळी आहे. बसून काम करण्याचं प्रमाण फार वाढत आहे. परिणामी आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. म्हणून प्रत्येकानं व्यायाम केला पाहिजे. परंतु व्यग्रतेच्या जीवनात व्यायाम करणं शक्य नसल्यास किमान काही पावलं चालणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया वयानुसार दररोज किती चालायला हवं.
तज्ञांचे मत : एंडोक्राइनोलॉजिस्टच्या मते प्रत्येक व्यक्तीनं (प्रौढ) दररोज किमान 10,000 पावलं चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे हृदय मजबूत होतं. हृदयविकार टाळण्यासाठी तर प्रत्येकानं चालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नियमित चालण्यास सुरुवात केली तर मधुमेह, ब्रेन स्ट्रोक, लठ्ठपणा, स्तनाचा कर्करोग आणि नैराश्य यासारखे भयावह आजारापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. तसंच चालण्यानं हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि कॅलरी बर्न होण्यासही मदत होते. याशिवाय चालण्यानं वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
अभ्यासानुसार रोज किती पावलं चालणं गरजेचं आहे -दरोराज किमान 10,000 पावलं चालणं गरजेचं आहे. म्हणजेच किलोमीटरमध्ये सांगायचं झाल्यास निरोगी आयुष्यासाठी 7.5 किलोमीटर चालणं बंधनकारक आहे. कित्येकांना सात किलोमीटर ऐकूण धक्का बसला असेल परंतु याचा अर्थ सतत चालत राहणं असं नाहीये. झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण हा पल्ला गाठला पाहिजे. तज्ञांच्या मते, जर तुम्ही सकाळी एक तास चाललात तर तुम्ही तुमचं चालण्याचं टार्गेट पूर्ण करू शकता. याव्यतिरिक्त नियमित किमान दीड तास खेळ खेळू शकता. यामुळे तुम्ही निरोगी तर राहताच शिवाय शरीरही मजबूत होतं.
वयानुसार किती चालावं?
40 वर्षांखालील महिला - दररोज 12,000 पावलं चालण्याची शिफारस केली जाते.
40 ते 50 वयोगटातील महिला - दररोज 11,000 पावलं चालण्याचं लक्ष्य ठेवावं.
50 ते 60 वयोगटातील महिला - दररोज 10,000 पावलं चालल्यास पूर्णपणे निरोगी राहू शकतात.