महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तीन मजली इमारतीवरून लटकली महिला, पतीनं पकडला हात, पण...; घटनेचा थरारक व्हिडिओ आला समोर - Woman slipped from terrace

Woman slipped from terrace : बेंगळुरूतील कनकानगरमध्ये इमारतीच्या टेरेसवरून महिला खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

Woman slipped from terrace
तीन मजली इमारतीवरून लटकलेली महिला (source : SOCIAL MEDIA)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 6:06 PM IST

बेंगळुरू Woman slipped from terrace :कर्नाटकातील बेंगळुरू येथून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहेत. एक महिला तीन मजली इमारतीवरून खाली पडलीय. महिला गच्चीवर कपडे धूत असताना तिचा पाय साबणावरून घसल्यानं ती कोसळली. तिचा नवराही तिच्यासोबत होता. महिला छतावरून खाली कोसळत असताना पतीनं तिचा हात धरला. त्यानं पत्नीला वर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हात पत्नीच्या हातातून निसटल्यानं पत्नी खाली पडली.

तीन मजली इमारतीवरून लटकलेल्या महिलाचा व्हीडिओ (source : SOCIAL MEDIA)

महिलेची प्रकृती चिंताजनक :त्यानंतर महिलेला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलय. तिची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. हे प्रकरण डीजे हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कनकनगरमध्ये घडलं आहे. 27 वर्षीय रुबाई या गच्चीवर कपडे धुत होत्या. कपडे वाळवायला टाकत असताना त्यांचा चुकून साबणावर पाय पडला. यामुळं त्यांचा तोल गेला. त्यावेळी त्यांचा पतीही त्यांच्यासोबत उभा होता.

हात निसटल्यामुळं महिला पडली : पत्नीचा तोल जाताच पतीनं तिचा हात पकडला. तो तिला वर ओढण्याचा प्रयत्न करत होता. महिलेला छताला लटकलेलं पाहून खाली रस्त्यावर बरीच गर्दी जमली होती. मात्र, कोणी मदतीला येईपर्यंत पतीच्या हातून पत्नीचा हात निसटला. त्यानंतर महिला तीन मजली इमारतीवरून खाली पडली. त्यामुळं तिला जबर मार लागला. खाली उभ्या असलेल्या लोकांनी मदत करत महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल केलंय.

महिलेचा व्हिडिओ व्हायरल : महिलेला व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. महिला सध्या कोमात असल्याची माहिती आहे. डॉक्टर महिलेवर उपचार करत आहेत. या घटनेचं छायाचित्रण समोर आलं आहे. महिला छताला लटकत असताना दुसऱ्या इमारतीवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं आपल्या फोनमध्ये महिलेचा व्हिडिओ काढला आहे.

'हे' वाचलंत का :

  1. मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करणारी गठित समिती कागदावरच? आठ महिन्यांपसून साधी बैठकही नाही - fisheries development policy
  2. लोकसभेच्या एका जागेवर भाजपा, शिंदेंनी दरोडा टाकला - संजय राऊत - Sanjay Raut
  3. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण अखेर मागे, मंत्री छगन भुजबळांसह शिष्टमंडळानं घेतली भेट - Chhagan Bhujbal

ABOUT THE AUTHOR

...view details