रायपूर Two Female Naxalites Killed : सुकमा आणि बीजापूर परिसरातील टेकलगुडेम इथं 30 जानेवारीला नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय जवानांना वीरमरण आलं होतं. या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्याची माहिती नक्षलवादी संघटनेनं जारी केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे. शनिवारी पीएजीए नक्षलवादी संघटनेनं सुरक्षा दलांवर टेकलगुडेम इथं केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पीएलजीए नक्षलवादी संघटनेच्या बस्तर दक्षिण विभागाची प्रवक्ता समता हिनं एक पत्रक जारी केलं. यात समतानं दोन महिला नक्षलवादी ठार झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
नक्षलवादी चकमकीनंतर खोटे दावे करतात. चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या जास्त असली तर ते लपवतात. यावेळीही नक्षलवाद्यांनी असंच काहीसं केलं. सुरक्षा दलांनी पाच ते सहा नक्षलवादी ठार केले. बस्तरमध्ये जवान वेगानं शोध मोहीम राबवत आहेत. एकेकाळी नक्षलवाद्यांसाठी सुरक्षित असलेल्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत. टेकलगुडेम परिसरापासून पुवरती गाव काही किलोमीटर अंतरावर आहे. नक्षलवादी कमांडर हिडमा आणि टेकलगुडेम हल्ल्याचा मास्टरमाईंड देवा हे दोघंही या गावचे रहिवासी आहेत. आता जवानांनी आपल्या गडात घुसल्याचं पाहून नक्षलवादी घाबरले आहेत. या दहशतीतून नक्षलवादी जवानांना लक्ष्य करत आहेत - सुंदरराज पी, पोलीस महानिरीक्षक, बस्तर
टेकलगुडेम इथं चकमक : सुकमा आणि विजापूर परिसरातील टेकलगुडेम इथं नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाच्या जवानांनीही नक्षलवाद्यांवर जोरदार गोळीबार केला. या चकमकीत पीएलजीए नक्षलवादी संघटनेच्या दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. पीएलजीए नक्षलवादी संघटनेची प्रवक्ता समता हिनं याबाबत पत्रक काढून माहिती दिली आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांचं मोठं नुकसान झाल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. मात्र चकमकीत नक्षलवाद्यांनी जवानांकडून लुटलेली काडतुसे आणि बॅग नेल्याचा दावा नक्षलवाद्यांनी एका छायाचित्राद्वारे केला आहे. मात्र नक्षलवाद्यांनी केलेल्या या दाव्याला प्रशासनाकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नाही.
नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी बांधले बेसकॅम्प :सुकमा परिसरात नक्षलवाद्यांच्या कारवाया सुरू असतात. त्यामुळं सुरक्षा दलांनी सुकमा आणि विजापूर इथं 12 नवीन बेसकॅम्प बांधले आहेत. याबाबतची माहिती बस्तरच्या पोलील महानिरीक्षकांनी दिली. याबाबत ते म्हणाले की, "विजापूर आणि सुकमा इथं सुरक्षा दलांसाठी 12 नवीन बेसकॅम्प बांधण्यात आले आहेत. विजापूर परिसरात 6 बेसकॅम्प बांधण्यात आले आहेत. तर सुकमामध्ये 6 बेसकॅम्प बांधण्यात आले आहेत. सुरक्षा दलांचा वाढता दबाव आणि नक्षलवाद्यांचा घेण्यात येणारा शोध, यामुळं नक्षलवादी घाबरले आहेत. त्यामुळं नक्षलवादी घाबरुन सुरक्षा दलांवर हल्ले करत आहेत."
हेही वाचा :
- छत्तीसगडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला; 3 जवान हुतात्मा, 10 हून अधिक जखमी
- सुकमात मोठा नक्षलवादी हल्ला, सीआरपीएफचा जवान हुतात्मा, मुख्यमंत्री विष्णुदेव साईंनी व्यक्त केला शोक